माझी इच्छा पूर्ण कर...! विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, नागपुरमधील धक्कादायक प्रकार

Nagpur Crime News: एका खासगी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर एका महिलेने गंभीर आरोप केलेत. अधिकाऱ्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना नागपूरमध्ये घडलीय.
Nagpur Crime News:
Nagpur Crime News:
Published On
Summary
  • नागपूरमधील खासगी विमा कंपनीत धक्कादायक घटना घडलीय.

  • वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

  • परदेश दौऱ्यादरम्यान लिस्बन येथे हा प्रकार घडल्याचा आरोप.

नागपूरमधील खासगी विमा कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना घडलीय. जर इच्छा पूर्ण केली नाही तर नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकीही अधिकाऱ्याने महिलेला दिली. या प्रकरणी महिलेने नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur Crime News:
Shocking : लॉजवर बंद खोलीत आढळला बडतर्फ पोलिसाचा मृतदेह; पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेसोबतचा हा धक्कादायक प्रकार एका परदेश दौऱ्यावेळी घडला. ३५ वर्षीय महिला कर्मचारी विमा कंपनीत २२ जानेवारी २०२० ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नागपूर विभागासाठी एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. डिसेंबर २०२४ मध्ये कंपनीकडून आयोजित करण्यात आलेल्या पोर्तुगाल येथील लिस्बन दौऱ्यासाठी सुमारे ५० ते ६० कर्मचारी जात होते. या दौऱ्यात आरोपीही उपस्थित होता.

Nagpur Crime News:
Crime News : नवऱ्याने मोबाईल घेऊन द्यायला नकार दिला, महिलेने मुलासह विहिरीत उडी मारली अन्...

विमान प्रवासादरम्यान आरोपीने वारंवार शेजारी बसण्याचा आग्रह धरला. मात्र पीडित महिलेने त्यांना स्पष्ट नकार दिला. लिस्बन येथे पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये आयोजित पार्टीनंतर आरोपीने महिलेला त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले. मात्र आरोपीचे वर्तन संशयास्पद वाटल्याने महिलेने नकार दिला आणि स्वतःच्या खोलीत गेली.

या घटनेनंतर आरोपी महिलेवर मानसिक दबाव टाकत असायचा. ऑक्टोबर २०२५ मध्ये कंपनीतील इन्सेन्टिव्ह संदर्भातील आरोप लावत महिलेला कारणे दाखवा नोटीस पाठवली. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ई-मेलद्वारे त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्याचदिवशी सायंकाळी आरोपीने फोनवरून संपर्क साधत अश्‍लील व अपमानास्पद भाषेत बोलत ‘माझी मागणी पूर्ण केली तर तुझे टर्मिनेशन रद्द करू शकतो,’ असे बोलून शरीरसुखाची मागणी केली.

या प्रकाराने महिलेला मानसिक धक्का बसला. त्यांनी तत्काळ फोन बंद केला. तसेच कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, एचआर विभाग तसेच ‘शी-बॉक्स’ पोर्टलवर लेखी तक्रार दाखल केली. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने तसेच नोकरी कायमची गेल्याने अखेर त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबत अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com