Mumbai Crime: संतापजनक घटना! अनाथ अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Minor Girl Rape In Navi Mumbai: नवी मुंबईत एका अनाथ अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. याप्रकरणी वाशी लोहमार्ग पोलिसांनी पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.
Mumbai Crime
Minor Girl Rape In Navi Mumbai Saam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे, साम प्रतिनिधी

नवी मुंबईत एक संतापजनक घटना घडलीय. एका अनाथ मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घणसोली रेल्वे स्थानक परिसरात घडलीय. मुलगी अनाथ असल्याचा फायदा घेत नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केला. अत्याचार केल्यानंतर पीडितेला घणसोली रेल्वे स्टेशन परिसरात सोडून पसार झाला. याप्रकरणी वाशी लोहमार्ग पोलीस तपास करत आहेत.

या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच वय हे १२ ते १४ वर्ष असून ती अनाथ आहे. याचाच फायदा घेत नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर त्याने पीडितेला घणसोली रेल्वे स्टेशनच्या परिसरात तसेच सोडून दिलं आणि तेथून पळून गेला. घणसोली रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी पीडित मुलगी सापडली होती. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता सदर प्रकार समोर आलाय.

Mumbai Crime
Mumbai Crime: पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून झाडल्या गोळ्या

पीडिता 12 ते 14 वर्षाची असून वाशी लोहमार्ग पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पीडित मुलीची रवानगी शेल्टर होममध्ये करण्यात येणार असून वाशी लोहमार्ग पोलीस याप्रकारणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

रिक्षाचालकाचा २० वर्षीय तरूणीवर बलात्कार, गुप्तांगात आढळले ब्लेड अन् दगड

काही दिवसापूर्वी मुंबईत अशीच हादरवून सोडणारी घटना घडली होती. मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनच्या जवळच रिक्षाचालकाने २० वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. नराधम रिक्षा चालकाने त्या तरूणीवर ब्लेड अन् दगडाने हल्ला केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.

Mumbai Crime
Husband Wife Clash: नवऱ्याचा भयानक प्रकार! चवताळून घेतला पत्नीच्या ओठांचा चावा, महिलेला पडले १६ टाके

मुंबईतील राम मंदिर स्टेशन परिसरात २० वर्षीय तरूणीवर अज्ञात रिक्षा चालकाने अत्याचार केला होता. रिक्षा चालकाने मुलीवर सिझेरियन ब्लेड अन् दगडाने हल्लादेखील केला. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई पोलिसांकडून हल्लेखोर रिक्षा चालकाचा शोध सुरू करण्यात आलाय. पीडित मुलगी मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी राज रतन वाळवल या आरोपीला अटक केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली. त्या महिलेला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com