Bhayandar Crime: धक्कादायक! चोर असल्याच्या संशयातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; ६ तासात आरोपी गजाआड

Crime News: नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे १ च्या सुमारास भाईंदर पूर्वच्या बी.पी.रोड येथील भाजी मार्केट परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

महेंद्र वानखेडे, प्रतिनिधी|ता. ८ फेब्रुवारी २०२४

Bhayandar Crime News:

नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे १ च्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता महत्वाची अपडेट समोर आली असून पोलिसांनी तपासचक्रे फिरवत ६ तासांच्या आत चार आरोपींना अटक केली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे १ च्या सुमारास भाईंदर पूर्वच्या बी.पी.रोड येथील भाजी मार्केट परिसरात सार्वजनिक शौचालयाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहीती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस तपास सुरू केला होता.

पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच घटनास्थळाचे आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या सहा तासात चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींवर नवघर पोलीस ठाण्यात कलम-३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crime News
Shambhuraj Desai : 'ते' मद्य विक्री केंद्र दहा दिवस बंद ठेवा, मालकांना सांगा... : शंभूराज देसाई

चोर असल्याच्या संशयातून हत्या?

मयत इसम भाजी मार्केट परिसरात रात्री एकच्या सुमारास गेल्यानंतर आरोपींसोबत त्याचा वाद सुरू झाला या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मयत तरुण कोणत्या उद्देशाने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी गेला होता ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मोबाईल चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचे समजून मारहाण करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (Latest Marathi News)

Crime News
Borivali News: १० हजार रुपये मिळवण्यासाठी तब्बल दीड महिना बँकेत हेलपाटे; अखेर बँकेतच मांडला ठिय्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com