Crime News
Crime NewsSAAM TV

Crime News: मोमोज खायला देतो सांगून अल्पवयीन मुलाचं अपहरण; CCTV चेक केल्यानंतर वडिलांना धक्काच बसला

Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे.
Published on

Mumbai Crime News:

धारावीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एकेकाळी बिझनेस पार्टनर असलेल्या व्यावसायिकाच्या ७ वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय नजीब शेखला शनिवारी अटक करण्यात आली आहे.

नजीब शेख दुबईत नोकरी करायचा. त्याचा मुलाच्या वडिलांशी काही आर्थिक वाद होता. त्याने लोकल ट्रेनमध्ये बेल्टने मुलाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलाला ट्रेनमध्येच सोडून तो नालासोपारा स्टेशनवर उतरला. अपहरण झालेला मुलगा विरार येथे सापडला असून त्याच्या घरच्यांकडे परतला आहे

यासंदर्भात धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक राजू बिडकर यांनी सांगितले की, मुलाचे वडील नकीब शेख यांनी अपहरण केल्याप्रकरणी एफआरआर दाखल केली आहे. त्यांच्या मुलगा रात्री उशिरापर्यंत परतला नाही. त्यानंतर त्यांनी मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, परिसरातील एका मुलाने सांगितले की अपहरण झालेला मुलगा शेवटी एका माणसासोबत जाताना दिसला. मुलांनी त्या मुलांचे वर्णन केले. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरात स्कॅन करण्यात आले. एका कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये हा मुलगा त्या माणसासोबत जाताना दिसला. त्यानंतर हा फोटो मुलाच्या वडिलांना दाखवण्यात आले. त्यांनी त्याची ओळख नजीब असल्याचे सांगितले. तो माझा बिझनेस पार्टनर असल्याचेही सांगितले. तो वांद्रे स्टेशनच्या दिशेने चालत जाताना कॅमेरात दिसला.

Crime News
Udupi Crime: भरदिवसा भयंकर हत्याकांड! घरात घुसून आईसह ३ मुलांना संपवलं; परिसरात खळबळ

त्यानंतर विरार स्टेशनवर एक मुलगा सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आमच्या टीमने तिथे जाऊन मुलाला ताब्यात घेतला आणि त्याच्या कुटुंबाकडे सोपवले, असे बिडकर म्हणाले. पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली.

आर्थिक वादातून अपहरण केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्याने मुलाला मोमोज खायला देतो असे आमिष दाखवले होते. त्यानंतर तो मुलगा आरोपीसोबत जाण्यास तयार झाला. आरोपीला १६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

Crime News
Bandra - Worli Sea Link: वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाने मारली उडी; आत्महत्येचं कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com