Udupi Crime: भरदिवसा भयंकर हत्याकांड! घरात घुसून आईसह ३ मुलांना संपवलं; परिसरात खळबळ

Udupi Crime News: महिलेची आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालीय.
 Karnataka Crime News
Karnataka Crime NewsSaam Tv
Published On

Karnataka Crime News:

देशभरात सध्या दिवाळीची धामधुम सुरू आहे. अशातच कर्नाटकमधून एक हादरवुन टाकणारी भीषण हत्याकांडाची घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात आई आणि ३ मुलांसह एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

कर्नाटकातील (Karnataka) उडुपी जिल्ह्यात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालीय. रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्याने आधी महिला आणि तिच्या दोन मोठ्या मुलांची हत्या केली. तेवढ्यात महिलेचा 12 वर्षांचा धाकटा मुलगा आत आला.

मारेकऱ्याने त्याला पाहताच त्याच्यावर हल्ला करून निष्पाप बालकाचाही चाकूने वार करून खून केला. मृताच्या शेजाऱ्याला आवाज आल्याने ते धाऊन गेले मात्र मारेकऱ्याने त्यालाही धमकावले. मारेकऱ्यांनी महिलेच्या सासूवरही चाकू हल्ला केला ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Karnataka Crime News
PM Kusum Scheme: PM कुसून योजनेत देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर; मुख्यमंत्री शिंदेंकडून ऊर्जा विभागाचं कौतुक

दरम्यान, शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. प्राथमिक तपासात हे हत्याकांड पुर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घरामध्ये कोणतीही चोरी झाली नाही किंवा कोणत्याही वस्तूला मारेकऱ्यांनी हात लावला नाही, त्यामुळे हे हत्याकांड वैयक्तिक कारणामुळे झाल्याची शक्यता उडुपीच्या जिल्हा अधिक्षकांनी वर्तवली आहे. (Latest Marathi News)

 Karnataka Crime News
Latur News: माणुसकी हरवली! महिला शिक्षिकेला व्यापारी दांपत्याकडून बॅटने अमानुष मारहाण; लोक फक्त बघत राहिले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com