Bengaluru Car Accident: भरधाव धावणाऱ्या कारने तीन दुचाकींना उडवलं; ४ जण जखमी

Car Accident : हा अपघात बेंगळुरूमधील हुलीमावूजवळ झाला असून यात ४ जण जखमी झाले आहेत.
Bengaluru Car Accident
Bengaluru Car AccidentTwitter

Bengaluru Car Accident:

बेंगळुरूमध्ये भरधाव धावणाऱ्य एसयूव्ही कारने तीन दुचाकींना धडक दिल्याची घटना घडलीय. हा अपघात बेंगळुरूमधील हुलीमावूजवळ झाला असून यात ४ जण जखमी झाले आहेत. दुचाकींना धडक देत कार चालक कार घेऊन तेथून पसार झालाय. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. (Latest News)

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक कारच्या डॅशकॅमध्ये या अपघाताचे दृश्य कैद झाले आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, दुचाकींना धडक देणाऱ्या कारच्या पुढे काही दुचाकी धावत आहेत. त्यावेळी ट्रॉफिक खूप संथ होती. त्यावेळी एक भरधाव येणारी कारने या दुचाकींना धडक दिली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारच्या धडकेती दुचाकीस्वार हवेत उडाले. भरधाव जाणाऱ्या एसयूव्ही कारने दुचाकींना धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. जखमींना हुलीमावूजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Bengaluru Car Accident
Punjab Accident: पंजाबमध्ये भीषण अपघात; १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या, घटनेचा थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com