Punjab Accident: पंजाबमध्ये भीषण अपघात; १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या, घटनेचा थरारक VIDEO

Punjab 100 Vehicles Accident: रस्त्यावर धुके असल्याने वाहने एकमेकांवर आदळ्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Punjab Accident
Punjab AccidentSaam TV

Punjab 100 Vehicles Accident:

पंजाबच्या लुधियाणामधील खन्ना येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एकमेकांवर एकूण १०० वाहने आदळल्याने भीषण अपघात झालाय. रस्त्यावर धुके असल्याने वाहने एकमेकांवर आदळ्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Punjab Accident
Uttar Pradesh Crime : हॉटेलमध्ये जबरदस्ती दारू पाजली; सामूहिक बलात्कारानंतर हॉटेलबाहेर फरफटत नेले, मित्रासह ५ जणांचे भयंकर कृत्य

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमृतसर- दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडलीये. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत. जखमी व्यक्तींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींचा आकडा १२ वर पोहचला आहे.

पहाटेच्यावेळी रस्त्याने जात असताना धुक्यामुळे दोन वाहने सुरुवातीला एकमेकांवर आदळली. त्यानंतर मागून येणाऱ्या वाहनांना देखील धुक्यामुळे काही दिसत नसल्याने त्यांची समोरील वाहनांना जेरदार धडक बसली. सलग १०० वाहने अशा प्रकारे एकमेकांवर आदळीयेत.

या अपघातात चारचाकी, दुचाकीसह एका बसचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर वाहनांचा अपघात झाल्याने अमृतसर- दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर वाहतुककोंडीची समस्या निर्माण झालीये. रस्त्यावर २५ ते ३० किलोमिरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब लागल्यात.

पहाटेच्यावेळी झालेल्या अपघातात काही प्रवासी गाढ झोपेत होते. अचानाक झालेल्या अपघातामुळे साऱ्यांनाच मोठा धक्का बसलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्यासह वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Punjab Accident
Nandurbar Crime News : लक्ष्मीपूजनाच्या रात्री युवकाचा खून, नंदुरबारच्या अमृत चौकात पाेलीसांचा माेठा बंदाेबस्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com