Crime news
Crime news Saam Tv

Nasahik News: दादागिरी करणं जीवावर बेतलं; नाशकात चुलत भावाकडून तरुणाची हत्या

Nasahik Crime News: भाऊससाहेब व त्याचा मित्र महेश यांनी ज्ञानेश्वरला जंगलात नेलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.
Published on

Nasahik News:

भावाभावांची भांडणं प्रत्येक घरात होत असतात. मात्र आपल्या भावासाठी सर्वात आधी मदतीला एक भाऊच धावून येत असतो. असं असलं तरी नाशिकमध्ये भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीये. नाशिकच्या मालेगावमध्ये चुलत भावानेच आपल्या भावाच खून केलाय.

 Crime news
Crime News: पती स्मार्ट दिसत नसल्यानं पत्नीचं भयंकर कृत्य; नवऱ्याला दिलं पेटवून

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील डोंगराळे येथे ही घटना घडलीये. या खूनाचा पोलिसांनी २४ तासात छडा लावत दोघांना ताब्यात घेतलंय. ज्ञानेश्वर जनार्दन ह्याळीज असं मृत व्यक्तीचे नाव आहे.

ज्ञानेश्वर सातत्याने त्याचा चुलत भाऊ भाऊसाहेब ह्याळीजच्या कुटूंबावर दादागिरी करत होता. त्याची नजरही संशयास्पद होती. जाणून बूजून त्रास देणे,अपमान करणे या रागातून चुलत भाऊ भाऊससाहेब व त्याचा मित्र महेश यांनी ज्ञानेश्वरला जंगलात नेलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.

मारहाण झाल्याने ज्ञानेश्वर अत्यवस्थ अवस्थेत तेथेच पडला होता. नातेवाईकांना याची माहिती मिळताच नातेवाईकांनी दवाखान्यात त्याला उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मालेगाव पोलिसांनी सुरवातील अकस्मात मृत्यृची नोंद केली होती.

पोलिसांना या प्रकरणी संशय आल्याने त्यांनी पुन्हा तपास सुरु केला. यावेळी गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता त्यांनी भाऊसाहेब व महेश यास ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यावेळी आपणच धारदार हत्याराने खून केल्याचे भाऊसाहेबने पोलिसांना सांगितले.

 Crime news
Crime News: हॉटेलात आढळला विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह; पोलीस तपासात समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com