वसई : राज्यभरात प्लास्टिक बंदी सुरू आहे. असे असताना वसई विरार परिसरात मात्र खुलेआम प्लास्टिकची (Plastic Ban) विक्री सुरू आहे. त्या अनुषंगाने आज महानगरपालिकेने एका गोडाऊनवर कारवाई करत १५ लाखांचा अवैध (Vasai) प्लास्टिकचा माल जप्त केला आहे. हे प्लास्टिक बाजारात विकण्यासाठी मनाई आली आहे. (Latest Marathi News)
प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे. यात आता दसरा आणि येणारी दिवाळीच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बाजारात उतरणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे युवा नेते राहुल सिंग यांना मिळाली होती. या धर्तीवर त्यांनी (Vasai Virar Municipal Corporation) महानगरपालिकेच्या मदतीने छापा मारला असता ही मोठी कारवाई समोर आली. जवळपास १५ लाखांचं हे अवैध प्लास्टिक असल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
वसई पूर्वेच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका गाल्यामध्ये हे प्लास्टिक उतरवून ठेवण्यात आले होते. दोन गाड्या भरतील इतके प्लास्टिक होते. हे सर्व प्लास्टिक गुजरातवरून येत असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्लास्टिक इथे आल्यानंतर वसई- विरार परिसरातल्या दुकानांमध्ये वितरित केलं जातं. त्यामुळे वसई- विरारमध्ये प्लास्टिकचा धंदा करणारे हे कोण आहेत याचा शोध पालिका करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.