Bandra - Worli Sea Link: वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाने मारली उडी; आत्महत्येचं कारण काय?

Bandra News: माझा मोबाईल खाली पडलाय सांगत वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाने मारली उडी
Bandra - Worli Sea Link
Bandra - Worli Sea LinkSaam Tv
Published On

Bandra:

वांद्रे-वरळी सी लिंकवरून २७ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकाश सिंह असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bandra - Worli Sea Link
Kalyan Crime: रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांना हेरायचे, मोबाईल, लॅपटॉप घेऊन पसार व्हायचे.. २ सराईत चोरटे गजाआड

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलिसांनी अपम्रूत्यूची नोंद केली आहे. आकाश सिंह हा परळचा रहिवासी होता. माझा मोबाईल खाली पडला आहे असं सांगून तो सी लिंकवर टॅक्सीतून उतरला. त्यानंतर त्याने उडी मारली. मच्छीमार नौकांच्या मदतीने पोलिसांनी म्रूतदेहाचा शोध घेतला आहे.

सर्वत्र दिवाळीची धामधूम असताना तरुणाच्या आत्महत्येने परिसरात खळबळ पसरली आहे. त्याने आत्महत्या नेमकी का केली याबाबत पोलीस अधिक तपास करतायत. तरुणांमधील मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसत आहे. अपयश आणि कुटुंबातील वाद विवाद अशा विविध समस्यांमुळे तरुण वर्ग टोकाचं पाऊल उचलत आहेत.

मानखुर्दमध्ये 32 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी मुंबईतील मानखुर्द येथे एका 32 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली होती. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील राहत्या घरी महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेत आपलं जीवन संपवलं होतं.

त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली होती. वर्षा शिंदे असं त्यांचं नाव असून कौटुंबिक वादामुळे त्या अस्वस्थ होत्या, असं त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून समोर आलं होतं. सततच्या वादाला कंटाळूनच त्यांनी मृत्यूला कवटाळलं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी दिलीय.

Bandra - Worli Sea Link
UP Crime : सख्ख्या ब्रम्हाकुमारी बहिणींनी संपवलं आयुष्य; CM योगींसाठी लिहिलेल्या चिठ्ठीतून सांगितले आश्रमातील काळे कारनामे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com