Digital Arrest Crime : व्हिडीओ कॉल उचला अन् ५८ कोटी गमावले, मुंबईतील व्यावसायिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत लुबाडलं

Mumbai Digital Arrest News : मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर ठगांनी सीबीआय अधिकारी बनून श्रीमंत जोडप्याला तब्बल ५८ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Digital Arrest Crime : व्हिडीओ कॉल उचला अन् ५८ कोटी गमावले, मुंबईतील व्यावसायिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत लुबाडलं
Digital Arrest CrimeSaam tv
Published On
Summary
  • मुंबईतील श्रीमंत जोडप्याला सायबर भामट्यांनी ५८ कोटी रुपयांना फसवलं

  • ठगांनी स्वतःला सीबीआय आणि ईडी अधिकारी असल्याचं भासवलं

  • भीती दाखवून दोन महिन्यांत १८ खात्यांत पैसे ट्रान्सफर केले

  • महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे

मुंबईतून धक्कदायक प्रकार समोर आला आहे. शहरातील श्रीमंत जोडप्यांना सायबर ठग्यांनी सीबीआय अधिकारी ओळख दाखवत कोट्यवधींचा गंडा घातला आहे. याप्रकरणी या जोडप्यांनी फसवणूक झाल्याचे समजताच पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. धक्कदायक म्हणजे या जोडप्याकडून सायबर ठग्यांनी ५८.१३ कोटी रुपये उकळले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सायबर ठग्यांनी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलद्वारे जोडप्याशी संपर्क साधला . त्यांनी स्वतःची ओळख सुब्रह्मण्यम आणि करण शर्मा अशी करून बनावट सरकारी ओळखपत्रे आणि कागदपत्रे सादर केली आणि केंद्रीय एजन्सींचे अधिकारी असल्याचा दावा केला.

Digital Arrest Crime : व्हिडीओ कॉल उचला अन् ५८ कोटी गमावले, मुंबईतील व्यावसायिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत लुबाडलं
Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

त्यानंतर ईडी आणि सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत या दोघांनी या जोडप्याला त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याचं बनावट कारण दिल. शिवाय त्यांनी या जोडप्याला म्हटलं की, जर त्यांनी तपासात सहकार्य करण्यासाठी "पैसे दिले नाहीत" तर तात्काळ अटक करण्यात येईल. दबाव आणि भीतीमुळे, या जोडप्याने दोन महिन्यांत १८ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ५८. १३ दशलक्ष रुपये ट्रान्सफर केले.

Digital Arrest Crime : व्हिडीओ कॉल उचला अन् ५८ कोटी गमावले, मुंबईतील व्यावसायिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत लुबाडलं
Jeevansathi Scam : "मंत्रालय, पोलिस दलातील अधिकारी माझ्या ओळखीचे...", कोकणातल्या बनावट पोलिसाने तरुणींना घातला गंडा

सायबर पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की फसवणूक करणाऱ्यांनी १९ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर दरम्यान आरटीजीएस व्यवहारांद्वारे हे पैसे गोळा केले. पैसे सापडू नये म्हणून प्रत्येक खात्यात अंदाजे २५ लाख रुपये जमा करण्यात आले. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आता हे पैसे जिथे जमा केले गेले त्या सर्व खात्यांची ओळख पटवली आहे आणि व्यवहाराच्या मार्गाची डिजिटल चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत, या खळबळजनक प्रकरणात अब्दुल खुल्ली (४७), अर्जुन कडवसरा (५५) आणि जेताराम कडवसरा (३५) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या टोळीने आतापर्यंत कोणत्या कोणत्या लोकांना लुबाडलं आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com