Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Pune News : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १.९७ कोटी रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला.
Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

  • सणासुदीपूर्वी १.९७ कोटी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त

  • ३५३ आस्थापनांची तपासणी, १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस जारी करण्यात आली

  • APMC मार्केटमध्ये ड्रायफ्रुट्सवर रासायनिक प्रक्रिया आणि भेसळ उघड झाली आहे

  • नागरिकांनी संशयास्पद अन्नपदार्थाबाबत टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करावी

ऐन सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली "सण महाराष्ट्राचा-संकल्प अन्न सुरक्षिततेचा" या अभियानाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य व जनहित लक्षात घेता विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १ कोटी ९७ लाख ९३ हजार ४२ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ३५३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून १९६ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे. कारवाईदरम्यान खवा, स्वीट मावा, गाईचे तुप, खाद्यतेल, दुध, पनीर, बटर व वनस्पती, भगर आदी अन्न् पदार्थाचे एकूण ६५४ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते, त्यापैकी २१६ अन्न् नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून १९० प्रमाणित दर्जाचे, ५ कमी दर्जाचे, ८ मिथ्याछाप, व १३ असुरक्षित नमुने आढळले आहेत. दोषी नमुन्यांवर कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त
Mumbai Bar News : मुंबईतील प्रसिद्ध बारमध्ये अल्पवयीन मुलींना दिली दारू, दोघींची प्रकृती खालवल्यामुळे खळबळ

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याबाबत शंका असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे केले आहे. शिवाय अशा भेसळयुक्त पदार्थांपासून सावध राहा असे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले आहे.

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त
KDMC News : आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, पालिकेकडून बोनस जाहीर, खात्यात पैसे कधीपर्यंत येणार?

मुंबईतील APMC मार्केटमध्ये भेसळयुक्त ड्रायफ्रुट्स

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई APMC मसाला मार्केटमधून शहरभर ड्रायफ्रुट्सचा पुरवठा होत असताना, या मागणीचा फायदा घेत काही भेसळखोरांनी बाजारपेठेत मोठा गोरखधंदा सुरू केल्याचे उघड झाले आहे. या मार्केटमधील G ,H,L विंग मधील गळ्यावर अनधिकृतपणे बदाम आणि ड्रायफ्युट्स मध्ये भेसळ करून आत आणि बाहेर विक्री केला जातोय .प्रत्यक्ष दृश्यांचे व्हिडिओ आता समोर आले असून, त्यातून भेसळीचे थरारक चित्र दिसत आहे. या व्हिडिओंमध्ये खिसमिसला रासायनिक द्रावणाने धुतले जात असल्याचे, त्यावर रंग आणि पावडर टाकून “चमकदार” बनविण्याची प्रक्रिया चालू असल्याचे स्पष्ट दिसते. हीच वस्तू पुढे प्रोसेसिंग करून फ्लेवर मध्ये निघतात आणि आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात विक्रीसाठी ठेवली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com