KDMC कडून ४५० आशा सेविकांना प्रत्येकी ५,००० रुपयांचा बोनस जाहीर
कामगार संघटनेच्या मागणीला यश आलं असून बोनस पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
सणासुदीच्या तोंडावर आशा सेविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे
कोरोना काळातील कार्याची दखल घेत पालिकेचा दिलासादायक निर्णय
संघर्ष गांगुर्डे, कल्याण-डोंबिवली प्रतिनिधी
आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी! सणासुदीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. हा निर्णय आशा सेविकांची दिवाळी गोड करणारा आहे. साडेचारशे आशा सेविका कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी ५,००० रुपये बोनस मिळणार आहे. या निर्णयाने आशा वर्कर मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही KDMC ने आपल्या नियमित कर्मचाऱ्यांसाठी २०,००० रुपयांचा भरघोस दिवाळी बोनस जाहीर केला होता. मात्र, शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आणि कोरोना काळात महत्त्वाचे काम केलेल्या आशा सेविकांना या बोनसमध्ये सुरुवातीला समाविष्ट करण्यात आले नव्हते. यामुळे आशा वर्करांमध्ये काहीशी नाराजी पसरली होती.
आशा सेविकांना दिवाळी बोनस मिळावा यासाठी ठाकरे गटाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी लावून धरली. कल्याण-डोंबिवली मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने या मागणीसाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला.कामगार संघटनेच्या या अथक प्रयत्नांना यश आले आहे. KDMC प्रशासनाने अखेर नमते घेत, बंद झालेला आशा वर्करचा बोनस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन बासरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेने आता साडेचारशे आशा सेविकांना प्रत्येकी ५,००० रुपये इतका दिवाळी बोनस देण्याचे मान्य केले आहे. या निर्णयामुळे साडेचारशे आशा वर्करची दिवाळी यंदा खऱ्या अर्थाने गोड आणि आनंदी होणार आहे. कामगार संघटनेच्या या यशामुळे आशा वर्करांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.