Election Voting Error : निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये घोळ! मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात, नागरिकांमध्ये संताप

Bhandara News : तुमसर नगर परिषद निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. नागरिक व उमेदवारांनी चुकीच्या प्रभागातील नावे, बोगस मतदार आणि असंतुलित मतदारसंख्येबाबत आक्षेप नोंदवले आहेत.
Election Voting Error : निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये घोळ! मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात, नागरिकांमध्ये संताप
Bhandara NewsSaam Tv
Published On
Summary
  • तुमसर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्या आहेत

  • अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाली आहेत

  • नागरिक आणि उमेदवारांनी मतदार यादी दुरुस्तीची व मुदतवाढीची मागणी केली आहे

  • काही प्रभागांतील मतदारसंख्या असंतुलित असल्याच्या बोगस मतदारांचाही आरोप

भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी जाहीर झालेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार, प्रभागांनुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. मात्र, या यादीत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि गंभीर त्रुटी असल्याच्या तक्रारी नागरिक आणि इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मतदार व इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागाची मतदार यादीचा अभ्यास करीत असल्यास त्यांच्या कुटुंबीयांच्या सदस्यांच्या नावांची पडताळणी केली असता, नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे दिसून आले आहे. काही नागरिकांनी त्यांची नावे वास्तविक राहत असलेल्या प्रभागाच्या हद्दी बाहेरही आढळल्याची तक्रार केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांना त्यांच्या प्रभागातील स्थानिक मतदार इतर प्रभागात गेल्याचे आढळले असून, काही प्रभागांतील मतदार संख्या अत्यल्प किंवा असामान्यरित्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

Election Voting Error : निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये घोळ! मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात, नागरिकांमध्ये संताप
Accident News : वाळूने भरलेल्या टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडले, मृतदेहाचे तुकडे, भंडाऱ्यात भयानक अपघात

अनेक ठिकाणी स्थानिक मतदारांची नावे त्यांच्या वास्तव प्रभागा ऐवजी इतर प्रभागांत समाविष्ट झाली आहेत. त्यात प्रभाग क्रमांक ५ मधील जवळपास ५०० ते ६०० मतदार प्रभाग क्रमांक २, ३, ६, ७ व इतर प्रभागात वळविण्यात आलेले आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदार हे बूथ बूथ फिरत राहतीत तसेच आपल्या मतदानाच्या हक्का पासून शहरांतील जवळ पास ५ ते ७ हजार मतदार वंचित राहतील. यामुळे मतदारांना योग्य प्रभागात मतदानाचा हक्क बजाविण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

Election Voting Error : निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये घोळ! मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात, नागरिकांमध्ये संताप
Diwali Special MSRTC Bus : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीसाठी अतिरिक्त ५५ गाड्यांचं नियोजन, जाणून घ्या कुठून कुठे धावणार बसेस

तरी सुद्धा नगरपरिषद निवडणूकप्राधिकृत अधिकारी (मतदार यादीचा) यांनी सर्व मतदार यादी दुरुस्ती करावी. प्रत्येक प्रभागातील मतदार याद्यांची पुन्हा स्थळ पडताळणी करावी. इच्छुक उमेदवारांनी व नागरिकांकडून एकत्रित स्वरूपात आलेले आक्षेप फॉर्म स्वीकारावेत. आणि सोबतच आक्षेप मुदत १५ दिवसांनी वाढवून द्यावी. अन्यथा कायदेशीर मार्गाने दाद मागावी लागेल. त्यातच कीत्येक प्रभागात बोगस मतदार असल्याची माहीती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com