महाड तालुक्यातील शिवथर परिसरात मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला.
आरोपी तुषार येनपुरेने मित्र तुळशीराम गायकवाडला पुलावरून नदीत ढकलले.
घटनेत तुळशीरामचा जागीच मृत्यू झाला आणि पोलिसांनी खुनाची नोंद केली.
परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून तपास सुरू आहे.
महाड तालुक्यातील शिवथर परिसरात मित्रांमधील किरकोळ वाद जीवघेणा ठरला आहे. चार मित्रांमध्ये झालेल्या भांडणातून एका तरुणाने आपल्या दुसऱ्या मित्राची पुलावरून नदीत ढकलून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील पीडिताचे नाव तुळशीराम गायकवाड असून आरोपीचे नाव तुषार येनपुरे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळशीराम गायकवाड, तुषार येनपुरे, रोशन येनपुरे, गणेश सुतार आणि आणखी एक अनोळखी मित्र असे पाच जण किराणा सामान घेण्यासाठी आंबे शिवथर येथे जात होते. सर्वजण कुभे शिवथर येथून पायी निघाले असता वाटेत काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. सुरुवातीला हा वाद अगदी निमुळता होता, मात्र थोड्याच वेळात हा वाद चिघळला.
वाद चिघळताच आरोपी तुषार येनपुरेने तुळशीराम याला पुलावरून नदीच्या पाण्यात ढकलले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तुळशीराम नदीच्या पाण्यात कोसळला आणि बाहेर पडू शकला नाही. यामुळे त्याचा नदीत बुडून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी तुषारने इतर मित्रांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच महाड MIDC पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी महाड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी तुषार येनपुरे याला ताब्यात घेतले आहे.
या घटनेने महाड परिसरात भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून वादाचे नेमके कारण काय होते, तसेच या घटनेत इतर मित्रांचा सहभाग होता का, याबाबत सखोल चौकशी केली जात आहे. एका क्षुल्लक वादामुळे जवळच्या मित्रानेच हत्या केल्यामुळे ही घटना मैत्रीच्या नात्याला काळिमा ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.