पैशांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; २१ वर्षीय महिलेने संपवले जीवन, पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Dowry Case : लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच हुंडा आणि पशांच्या सततच्या मागणीमुळे सासरच्या मंडळींनी केलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून २१ वर्षीय तरुण विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे.
dowry harassment case in ahilyanagar, Maharashtra
dowry harassment case in ahilyanagar, Maharashtra saam tv
Published On: 

अहिल्यानगर जिल्ह्यात विवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणी येथे २१ वर्षीय साक्षी रोहित कु-हे हिने १७ नोव्हेंबर रोजी आपले जीवन संपवले. सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे यांच्यासह पाच जणांविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हे साक्षीचे माहेर असून तिचा विवाह लोणी येथील रोहित कु-हे याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळातच सासरच्या मंडळींकडून तिचा पैशांसाठी छळ सुरू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घरखर्चासाठी तसेच गॅरेज सुरू करण्यासाठी साक्षीकडे तीन लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. ही रक्कम माहेरून आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. पैसे आणण्याच्या मागणीवरून तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

dowry harassment case in ahilyanagar, Maharashtra
Pune Crime : इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन! गोव्यातून पुण्यात आले, मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकले

सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या या कथित छळाला कंटाळून साक्षीने १७ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे. अवघ्या २१ वर्षांच्या तरुणीने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

dowry harassment case in ahilyanagar, Maharashtra
ChatGPT scam : चॅटजीपीटीच्या मदतीने एसी लोकलचा बनावट पास तयार! विरारच्या प्रवाशाचा हायटेक प्रताप उघड

दरम्यान, या प्रकरणी साक्षीचा पती रोहित, सासू, सासरे आणि अन्य दोन महिलांविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमकी कारणे, छळाचे स्वरूप आणि यामध्ये संबंधितांची भूमिका याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा विवाहित महिलांच्या सुरक्षिततेचा आणि हुंडा तसेच पैशांच्या मागणीसाठी होणाऱ्या छळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.