पुणे : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आईसह पतीवर गुन्हा दाखल

Pune Crime : अल्पवयीन मुलीचा विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे माहिती असताना देखील 16 वर्षांच्या मुलीचा विवाह केल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यात घडली.
loni kalbhoe police charged five along wtih mother and husband in child marriage case
loni kalbhoe police charged five along wtih mother and husband in child marriage case Saam Digital

- सागर आव्हाड

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या बालविवाह प्रकरणी संबंधित मुलीच्या आईसह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मुलीशी विवाह करणा-यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नाेंदविल्याची माहिती लाेणी काळभाेर पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

एका 17 वर्षीय मुलीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. बालविवाहाचा प्रकार 2023 ते 2024 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या आईने एका युवकासमवेत ठरविला होता. विवाहाच्या वेळी मुलगी 16 वर्षांची हाेती. या विवाहाला कोणीच विरोध केला नाही.

loni kalbhoe police charged five along wtih mother and husband in child marriage case
Konkan: आंब्याच्या लाकडी पेट्या होणार इतिहासजमा, प्लॅस्टिकच्या कॅरेटला बागायतदारांची पसंती; जाणून घ्या कारण

हा विवाह परिसरातील एका मंगल कार्यालयात संपन्न झाला. विवाहानंतर आरोपी पतीने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. यातून पीडिता गरोदर राहिली. प्रसूतीदरम्यान, अल्पवयीन मुलीच्या 8 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी पीडित मुलीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर 5 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुलीच्या आईचा समावेश आहे तसेच पतीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

loni kalbhoe police charged five along wtih mother and husband in child marriage case
Lasalgaon Bandh: पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील 'या' गावात कडकडीत बंद, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com