Lasalgaon Bandh: पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील 'या' गावात कडकडीत बंद, Video

लोकसभा निवडणुकीवर देखील लासलगाव येथील नागरिकांनी बहिष्काराचा इशारा यापूर्वीच दिला आहे. आजच्या बंद नंतर प्रशासन काेणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
lasalgaon bandh today citizens demands regular water supply
lasalgaon bandh today citizens demands regular water supplySaam Digital

- अजय साेनवणे

लासलगाव येथे सातत्याने पाणीपुरवठा विस्कळीत हाेत असल्याने नागरिकांसह व्यापा-यांनी आज (शनिवार) लासलगाव बंदची हाक दिली हाेती. त्यास शहरातील सर्व व्यावसायिकांनी पाठींबा देत शंभर टक्के दुकानं बंद ठेवली. दरम्यान आता तरी सुस्त प्रशासन पाणी प्रश्न साेडविण्यासाठी ठोस पावले उचलणार का असा सवाल केला जात आहे. (Maharashtra News)

लासलगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेतील पाणी पुरवठा वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विस्कळीत होत आहे. या कुत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. सुरळीत पाणी पूरवठा व्हावा यासाठी नागरिकांनी आज लासलगाव बंदची हाक दिली हाेती.

lasalgaon bandh today citizens demands regular water supply
Hingoli Accident News : हिंगोलीत भीषण अपघात, ट्रॅक्टरने दोघांना चिरडले; महिला गंभीर जखमी

या बंदला दुकानदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद देण्यात आला आहे. दुकानदारांनी आप-आपली दुकाने बंद ठेवल्यामुळे नेहमीच गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. लोकसभा निवडणुकीवर देखील बहिष्काराचा इशारा या बंद अगोदर नागरिकांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रशासनाच्या वतीने यावर तोडगा काढण्यासाठी काेणत्याच हालचाली होताना दिसत नसल्याने आजच्या बंद नंतर सुस्त प्रशासन ठोस पावले उचलणार का याकडे आता लासलगावकरांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

lasalgaon bandh today citizens demands regular water supply
Konkan: आंब्याच्या लाकडी पेट्या होणार इतिहासजमा, प्लॅस्टिकच्या कॅरेटला बागायतदारांची पसंती; जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com