Latur crime : धक्कादायक! लग्नाचं वचन देत २० वर्षीय तरूणीवर अत्याचार, पीडिता ७ महिन्यांची गर्भवती

Girl physically abused by luring her marriage : लातूरमध्ये लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरूणीचं वय २० वर्ष असल्याची माहिती मिळतेय.
लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार
Girl physically abused Saam Tv
Published On

संदिप भोसले, साम टीव्ही लातूर

राज्यात एकापाठोपाठ एक अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांचं सत्र सुरूच आहे. लग्नाचं आमिष दाखवून २० वर्षीय तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना लातूरमधून समोर आलीय. पीडित तरूणी ७ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती मिळतेय. या अत्याचार प्रकरणी एकास अटक करण्यात आलीय. लातूरच्या औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार

अत्याचार आणि बलात्कारांच्या घटना ताज्या असतानाच लातूरच्या औसा तालुक्यात वीस वर्षीय मुलीला (Latur crime news) लग्नाचं दाखवून एका २३ वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून मुली सोबत जवळीक साधली आणि यात पीडित मुलगी 7 महिन्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे.., दरम्यान याप्रकरणी आता औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर पत्नीच्या आत्महत्येनंतर पती फरार

डॉक्टर पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी पती तर अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणारा रिक्षा चालक फरार झाल्याचं समोर (physically abused) आलंय. छत्रपती संभाजी नगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या बजरंग चौक परिसरातील ही घटना आहे. सतत संशय घेऊन मानसिक शारीरिक छळ करून डॉक्टर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा डॉक्टर पती फरार झालाय.

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार
Thane Tennis Coach Rapes Minor Girl: टेनिस प्रशिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता ७ आठवड्यांची गरोदर

अश्लील चाळे करणारा रिक्षा चालक फरार

दुसरीकडे बाबा चौक ते कोकणवाडी चौक प्रवासादरम्यान चालत्या रिक्षात एका अल्पवयीन विद्यार्थिनी समोर अश्लील चाळे करणारा रिक्षा चालक हा देखील शहर सोडून फरार झाला आहे. या दोघांच्याही शोधासाठी सिडको आणि वेदांत नगर पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले (crime news) आहेत. डॉक्टर पतीचं कुटुंब देखील घर बंद करत मोबाईल बंद करून पसार (Latur news) झालंय, असं पोलिसांनी सांगितलं आहे. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं या महिला डॉक्टरचे नाव असून तिने आत्महत्या पूर्वी सात पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती.

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार
Shahid Kapoor On Physical Abuse: धक्कादायक! लहानपणीच शाहीद कपूरचं झालंय फिजिकल अब्युज, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com