राजा रघुवंशी हत्या प्रकरण : FIRची कॉपी समोर, दागिने आणि रोख रकमेने भरलेल्या पर्सबद्दल धक्कादायक खुलासा

Raja Raghuvanshi Murder FIR : इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरची (FIR) प्रत समोर आली आहे. सोनम बेपत्ता असताना झालेल्या हत्येनंतरचा हा एफआयआर आहे.
Raja Raghuvanshi Murder FIR
Raja Raghuvanshi Murder FIRSaam Tv News
Published On

इंदूर : इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरची (FIR) प्रत समोर आली आहे. सोनम बेपत्ता असताना झालेल्या हत्येनंतरचा हा एफआयआर आहे. एफआयआरनुसार, राजाची सोन्याची साखळी, सोन्याची साखरपुड्याची अंगठी, लग्नाची अंगठी, सोन्याचं ब्रेसलेट आणि रोख रक्कम भरलेली पर्स गायब होती. राजाच्या भावाच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. राजा आणि त्यांची पत्नी सोनम रघुवंशी २१ मे रोजी शिलाँगला पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ मे रोजी एक स्कूटी भाड्याने घेऊन सोहराला निघाले.

जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा तो आधीच कुजला होता

२२ मे रोजी दुपारपासून कुटुंबाचा दोघांशी संपर्क तुटला होता. यानंतर राजा आणि सोनमचे कुटुंब शिलाँगला पोहोचले आणि अनेक दिवसांच्या शोधानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. राजाच्या भावाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा तो आधीच कुजलेला होता.

Raja Raghuvanshi Murder FIR
Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी प्रकरणात खळबळजनक खुलासा; पतीच्या हत्येनंतर सोनम इंदूरमध्ये आलेली, बॉयफ्रेंड राजसोबत रुममध्ये...

वडिलांनी मागितली फाशीची शिक्षा

दरम्यान, राजा रघुवंशी यांचे वडील अशोक रघुवंशी म्हणाले की, त्यांच्या मुलाच्या हत्येतील सर्व दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. राजा रघुवंशी यांचे लग्न ११ मे २०२५ रोजी झाले होते.

सोनम रघुवंशी हिने कट रचला

मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, राजाची पत्नी सोनम रघुवंशी या हत्येत सहभागी आहे. सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून हा खून करण्याचा कट रचला होता.

Raja Raghuvanshi Murder FIR
Raja Raghuvanshi Case : जिथे हत्या केली, तिथेच हिशोब होणार; मध्यरात्री सोनमला शिलाँगला नेणार, नेमकं काय घडणार?

खोल खड्ड्यात मृतदेह आढळला

या प्रकरणात आनंद कुर्मी, राज कुशवाह, विशाल चौहान आणि आकाश राजपूत यांना अटक करण्यात आली आहे. सोनम रघुवंशीने राज कुशवाहाच्या मदतीने मारेकऱ्याला कामावर ठेवले होते. २० मे रोजी राजा आपल्या पत्नीसह हनिमूनसाठी मेघालयला गेला होता. तो पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील धबधब्याच्या जवळ एका खोल खड्ड्यात सापडला.

१६ मे ला बनवला शेवटचा प्लॅन

सुरुवातीला कुटुंबाला वाटलं की हे बेपत्ता होण्याचं प्रकरण आहे. पण ७-८ जून रोजी सोनम रघुवंशीने गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केलं. त्यानंतर या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमनेच हत्येसाठी पैसे दिले होते. लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनी सोनमने राजला राजाला मारण्यास सांगितलं होतं. १६ मे रोजी सोनमने तिच्या प्रियकरासोबत शेवटचा प्लॅन आखला होता.

Raja Raghuvanshi Murder FIR
चॉकलेटच्या किमतीत यायचं एक तोळा सोनं, ६४ वर्षांपूर्वीचं बिल पाहून तुम्हीही म्हणाल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com