चॉकलेटच्या किमतीत यायचं एक तोळा सोनं, ६४ वर्षांपूर्वीचं बिल पाहून तुम्हीही म्हणाल...

64 Year Old Gold Bill Goes Viral : आता सोन्याच्या दागिन्यांचं एक बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे बिल ६४ वर्षांपूर्वीचं आहे जेव्हा १० ग्रॅम सोन्याची किंमत आज एक लिटर पेट्रोलच्या बरोबरीची होती. आता इतक्या प्रमाणात फक्त चॉकलेट खरेदी करता येते.
 Pune shop 64-year-old gold bill goes viral
Pune shop 64-year-old gold bill goes viralSaam Tv News
Published On

आजकाल सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू आहे. ज्यामध्ये लोक जुन्या नोटांचे फोटो शेअर करत आहेत. अलिकडेच बुलेट बाईक, सायकल आणि गव्हाच्या बिलांचा फोटो व्हायरल झाला होता. आता सोन्याच्या दागिन्यांचं एक बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे बिल ६४ वर्षांपूर्वीचं आहे जेव्हा १० ग्रॅम सोन्याची किंमत आज एक लिटर पेट्रोलच्या बरोबरीची होती. आता इतक्या प्रमाणात फक्त चॉकलेट खरेदी करता येते. महागाई इतकी वाढली आहे की लोक सोने खरेदी करण्याचा विचारही करत नाहीत. आजच्या काळात सोने सामान्य माणसाच्या हातातून खूप दूर गेलं आहे. एक काळ असा होता जेव्हा सोने इतके महाग नव्हते. सामान्य माणूस ते सहज खरेदी करू शकत होता.

एक तोळा सोन्याची किंमत एक लिटर पेट्रोलइतकी

व्हायरल होत असलेल्या या बिलात तुम्हाला दिसेल की ६४ वर्षांपूर्वी एक तोळा सोन्याची किंमत फक्त ११३ रुपये होती. तर आज एक तोळा सोन्याची किंमत ५० हजार रुपये आहे. हे बिल काळजीपूर्वक पाहिल्यास कळेल की ते महाराष्ट्रातील पुणे येथील एका दुकानाचे आहे. बिलात दुकानाचे नाव मेसर्स वामन निंबाजी अष्टेकर असे लिहिले आहे. व्हायरल पोस्टमध्ये हे बिल ६४ वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जात आहे. स्लिपवर लिहिलेली तारीख ३ मार्च १९५९ आहे. खरेदीदाराचे नाव शिवलिंग आत्माराम असे लिहिले आहे. बिल काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला कळेल की आत्मारामने सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले होते, ज्याची एकूण किंमत ९०९ रुपये होती. खरेदीदाराने सोने-चांदी दोन्हीचे दागिने खरेदी केले होते.

बिल पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले

हे बिल १९५९ चे आहे आणि आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या बिलाची तुलना आजच्या सोन्याच्या दराशी केली जात आहे. हे बिल पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील वापरकर्ते आश्चर्यचकित झाले आहेत आणि पोस्टवर कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने या पोस्टवर कमेंट करत लिहिले की पाहिले तर ते खरोखर चांगले दिवस होते. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, 'आज इतक्या पैशात चांगली चॉकलेटही खरेदी करता येत नाही.' तर दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली - या बिलात कर देखील नमूद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com