Sonam Raghuvanshi History : सोनमला करायचं होतं MBA, राजासाठी ठेवला होता उपवास; मग पतीला संपवण्याचा कट का रचला?

Sonam Raja Raghuvanshi Case : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात अटक केलेल्या चारही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतशी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Sonam Raghuvanshi History
Sonam Raghuvanshi History Saam Tv News
Published On

इंदूर : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात अटक केलेल्या चारही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतशी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लग्नाच्या काही दिवसांतच सोनम रघुवंशीने पतीच्या हत्येचा कट रचण्याचे इतके भयानक पाऊल का उचलले याचं लोकांना आश्चर्य वाटत आहे.

सोनम रघुवंशी ही २४ वर्षांची आहे तर तिचा पती राजा २८ वर्षांचा आहे. सोनमवर तिचा जोडीदार राज कुशवाहासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. ती राजसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सोनम इंदूरमध्ये लहानाची मोठी झाली. तिचे वडील देवी सिंह रघुवंशी २५ वर्षांपूर्वी गुना येथून येथे आले आणि त्यांनी येथे प्लायवूड व्यवसाय सुरू केला. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, सोनम पदवीधर आहे आणि तिने तिच्या वडिलांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यात खूप मदत केली. सोनमचे वडील म्हणतात की कुटुंब सोनमवर लक्ष ठेवत होते आणि आम्ही तिला घराबाहेर पडून अनोळखी लोकांशी बोलू देत नव्हतो. देवी सिंह म्हणतात की ती फक्त काम आणि घरीच असायची.

Sonam Raghuvanshi History
Mumbai Local Accident : ३ दिवसांपूर्वी मुंब्रा, आज बोरीवली-दहिसरमध्ये घटना; धावत्या लोकलच्या दरवाजातून तरुण पडला

गेल्या काही वर्षांत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. सोनमचा भाऊ गोविंदने त्याच्या वडिलांचा व्यवसाय गुजरातमध्ये वाढवला. मध्य प्रदेशातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'सोनमने एकदा एमबीए करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण जेव्हा कुटुंबाने तिला व्यवसायात मदत करावी, असं स्पष्टपणे सांगितलं तेव्हा तिने तो विचार सोडून दिला.'

सोनम आणि राज एकमेकांच्या जवळ कसे आले?

याचवेळी सोनम राजला पहिल्यांदा भेटली. राज तिच्या वडिलांच्या कारखान्यात काम करत होता आणि त्याच परिसरात राहत होता. सुरुवातीला दोघे फक्त कामाबद्दल बोलत होते पण नंतर ते जवळ आले. सोनमच्या कुटुंबातील सदस्यांचं म्हणणं आहे की, त्यांना याची काहिच माहिती नव्हती आणि आतापर्यंत त्यांचा असा दावा आहे की पोलीस या प्रकरणात खोटे बोलत आहेत.

Sonam Raghuvanshi History
Sonam Raghuvanshi Case : राज कुशवाह फक्त मोहरा, मोबाईलमध्ये सोनम दीदी म्हणून नंबर सेव्ह; राजा रघुवंशी प्रकरणात सस्पेन्स वाढला

राजाला मेघालयाला जायचे नव्हते

या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, लग्नानंतर सोनमने हनिमूनला जाण्याबद्दल सांगितलं. राजा रघुवंशी याने सुरुवातीला नकार दिला पण सोनमने आग्रह धरला आणि तिकिटे बुक केली आणि राजाला मेघालयला जाण्यास राजी केलं. सोनमने परतीच्या प्रवासासाठीही तिकिटे बुक केली होती आणि तिने राजाला प्रवासादरम्यान महागडे दागिने घालण्यास सांगितलं होतं.

Sonam Raghuvanshi History
Sonam Raghuvanshi : सोनम प्रकरणात 'मिस्ट्री मॅन' जितेंद्र रघुवंशीची एन्ट्री, खात्यातून लाखोंचे व्यवहार; राज कुशवाह सांभाळत होता अकाउंट्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com