Cyber Crime: एंजल प्रियाचा मेसेज आलाय? प्रेमाच्या जाळ्यात अडकाल तर महागात पडेल 'व्हॅलेंटाईन डे'

Cyber Crime Department Alert : व्हॅलेटाईन वीकमध्ये सायबर गु्न्हे होऊ नये, यासाठी सायबर सेल सतर्क झाले असून त्यांनी नागरिकांना सावधानगिरी बाळणारा संदेश दिलाय.
Cyber Crime
Cyber Crime Department Alert Saam Tv
Published On

व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, याकाळात अनेकजण आपल्या प्रेमाची कबुली देतात. तर काहीजण प्रिय व्यक्तीला प्रपोज करतात. या व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमाचं वातावरण असून पर्यटनस्थळ, सार्वजनिक बागा, गार्डनमध्ये प्रेमी जोडपी दिसताहेत. काहीजण ऑनलाईन आपले प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही सिंगल असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अशा परिस्थितीत एकटेपणा घालवण्यासाठी तुम्ही कुठल्या डेटिंग अ‍ॅपचा आधार घेणार असाल तर सावध व्हा.

व्हॅलेंटाईनच्या वीक दरम्यान सिंगल लोकांची काहीजण त्यांची खिल्ली उडवत असतात. सिंगल लोकांवरील मीम्स आणि रिल्सही व्हायरल होत असतात. त्यातून त्यांची टिंगल केली जाते. तुम्हीही सिंगल असाल आणि एकटेपणा घालवण्यासाठी तुम्ही कुठल्या डेटिंग अ‍ॅपचा आधार घेणार असाल तर सावध व्हा. या प्रेमाच्या आठवड्यात एंजल प्रिया नावाच्या व्यक्तीचा मेसेज अनेकांना येतोय. पण मेसेज अनेकांना गंडा घालत आहे. त्यामुळे थेट इंडियन सायबर क्राइमने सावधानगिरी बाळगणारा संदेश पाठवलाय.

Cyber Crime
Crime News: किरकोळ वादातून डोक्यावर दारूची बाटली फोडली, जिथे गुन्हा घडला तिथेच धिंड काढली

सावध राहण्यासाठी सरकारकडून आवाहन

व्हॅलेटाईन डे वीकमध्ये पार्टनर शोधण्यासाठी अनेकजण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आधार घेतात. याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार हनीट्रप लावत आहेत. यात अनेकजण अडकले असून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक झालीय. त्यामुळे इंडियन सायबर क्राईमने लोकांना व्हॅलेंटाईन वीक दरम्यान सावध राहण्याचे आवाहन केलंय.

Cyber Crime
Crime News: लग्नाचे आमिष दाखवून मामाच्या मुलीवर बलात्कार, व्हिडिओ शूट करून करायचा ब्लॅकमेल

I4C ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलंय की, डेटिंग स्कॅम एंजल प्रिया प्रेमाचं नाव करून फसवणूक करू शकते. जर तुम्हाला डेटिंग साइटवर असं कोणी भेटलं, जे तुम्हाला गुंतवणूक आणि उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवत असेल तर काळजी घ्या, असा संदेश सायबर गुन्हे विभागाकडून पाठवण्यात आलाय.

कसा ओळखाल हनीट्रॅप ?

जर तुम्ही संबंधित अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर एखादी तरुणी तुम्हाला संपर्क साधते.

तुमच्यातील बोलणं वाढल्यानंतर प्रेमात पडल्याचे नाटक केलं जातं.

एकदा विश्वास संपादन केल्यानंतर तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं जातं.

जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुमच्यासोबत ब्रेकअप केलं जातं.

पुरुष मुलींचे नाव वापरुन हे गंडा घालत असतात

त्यामुळे जर कोणी कमी वेळात जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवत असेल तर सावध व्हा. अनेक प्रकरणांमध्ये तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला परतावा दिला जातो.जेव्हा तुम्ही गुंतवणूक वाढवत असतात, तेव्हा तुमची फसवणूक केली जाते. जर तुमच्यासोबत अशी घटना घडली तर cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com