

बहिणीच्या लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आला
कालव्यात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ
कुटुंबीयांनी निष्पक्ष चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली
पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला
हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. दुसऱ्या दिवशी तलावामध्ये अर्धनग्न अवस्थेत तिचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या तरुणीसोबत नेमकं काय घडलं? याचा तपास पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी असं या मृत तरुणीचे नाव होते. ती कर्नालच्या झिंझरी गावात कुटुंबीयांसोबत राहत होती. ती एका सरकारी रुग्णालयामध्ये लॅब टेक्निशियनचा कोर्स करत होती. मीनाक्षीच्या मोठ्या बहिणीचे १२ जुलै रोजी लग्न झाले. लग्नानंतर तिची बहिणी माहेरी आली होती. रविवारी त्यांच्या घरी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मीनाक्षी बहिणीसाठी कपडे खरेदी करण्यासाठी स्कूटरने गेली होती. चंदीगडच्या दिशेने ती गेली होती पण शॉपिंग करून ती परत घरी आलीच नाही. त्यामुळे तिचे कुटुंबीय चिंतेत आले होते. त्यांनी तिचा शोध घेतला पण ती भेटली नाही. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत मीनाक्षी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच यमुना कालव्यात मीनाक्षीचा मृतदेह आढळून आला. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. त्यामुळे तिच्यासोबत काही तरी चुकीचं घडलं असावं असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मिनाक्षीचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढला. तिची स्कूटर अद्याप सापडली नाही. मिनाक्षीसोबत काही तरी भयंकर घडलं आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करत तिला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.
याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, 'रविवारी पश्चिम यमुना कालव्यात एका अज्ञात तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्यासाठी शवागारात ठेवण्यात आला होता. सोमवारी ओळख पटल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सध्या, पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. तरुणीच्या स्कूटरचा शोध घेतला जात असून मृत्यूच्या कारणासह प्रत्येक पैलू लक्षात घेऊन तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.