Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Goregaon Crime: एका चोराने कामगारांचा मोबाईल फोन चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कामगारांनी त्याला बांधून मारहाण केली. हर्षल पर्मा या २६ वर्षीय तरुणाला मारहाणीत मृत्यू झालाय.
Goregaon Crime
Goregaon West: Youth beaten to death by workers for attempted mobile theft; police arrest five accused.saamtv
Published On
Summary
  • गोरेगाव पश्चिम भागात मोबाईल चोरीच्या प्रयत्न करणाऱ्याला बेदम मारहाण

  • मृत तरुणाचं नाव हर्षल परमा असे आहे.

  • पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

एका मोबाईल चोराला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. या हाणामारीत चोराचा मृत्यू झालाय. इमारतीच्या बांधकाम करणाऱ्या कामगारांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला कामगारांनी चोराला मारहाण केली. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हर्षल परमा (26) अशी मृताची ओळख झालीय.

या प्रकरणी पोलिसांनी ५जणांना अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमधील मोतीलाल नगर मध्ये ही घटना घडली आहे. मारहाणीची घटना घडली तेथून हाकेच्या अंतरावर गोरेगाव पोलीस चौकी आहे. मोतीलाल नगर भाग ३ मध्ये राज पॅथर डेव्हलपरकडून एका इमारतीचे बांधकाम करणात येत आहे.

Goregaon Crime
Crime News: पंधरा वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर जडला मामीचा जीव; लग्नाला नकार देताच घेतला टोकाचा निर्णय

या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बांधकाम करणारे कामगार रात्री झोपले होते. त्यावेळी एका चोरट्याने या कामगारांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. इमारतीत प्रवेश करून चोर मोबाईल चोरत असताना कामगारांना जाग आली, त्यामुळे कामगारांनी त्याला पकडलं आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पाच कामगारांनी या चोराला मारहाण केली, यातील २ दोघांनी चोराला बांधून ठेवलं, तर दोघांनी मारलं.

Goregaon Crime
Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

तर एकाने मारहाणीचा व्हिडिओ शूट केला. चोराला मारहाण होत असताना इमारत बांधकामाचा सुपरव्हायझर होता, त्याला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने गोरेगाव पोलिसांना याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी चोराला कामगाराच्या तावडीतून सोडवलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केलं.

मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना अटक केली आहे. सलमान खान, इसम्मुला खान, गौतम चमार, राजीव गुप्ता आदी पाच जणांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात अजून कोणाचा समावेश आहे का याचा तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com