Crime News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करांना अटक; अंतर्वस्त्र अन् मिक्सरमध्ये लपवलं होतं २.५८ कोटी रुपयांचं सोनं

Gold smugglers : डीआरआय विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक केलीय. जेद्दाहवरून आलेल्या दोन प्रवाशांनी अंतर्वस्त्रात हे सोनं लपवलं होतं. प्रत्येकाकडे १ लाख रुपयांचे सोनं होतं.
Gold smugglers
Gold smugglers Saam Tv
Published On

सचिन गाड, मुंबई

Gold smugglers arrested at Mumbai International Airport :

महसूल सक्तवसुली संचालनालयाने (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक केलीय. डीआरआय या आरोपींकडून ४ किलो सोनं जप्त केलं आहे. बाजारात या सोन्याची किंमत तब्बल २.५८ कोटी रुपये आहे. सोन्याची तस्करी करणारे आणि सोने घेण्यासाठी आलेल्या इतर दोघांना अटक करण्यात आली. (Latest News)

डीआरआय विभागाने कारवाई केलीय. जेद्दाहवरून आलेल्या दोन प्रवाशांनी अंतर्वस्त्रात (underwear) हे सोनं लपवलं होतं. प्रत्येकाकडे १ लाख रुपयांचे सोनं होतं. तर दोन जणांनी मिक्सरमध्ये सोनं लपवलं होतं. सोन्याची डिलिव्हरी घेण्यासाठी आलेल्या दोघांना देखील अटक करण्यात आलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, दोन आरोपी प्रवासी सौदी अरबच्या जेद्दावरून ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. या डीआरआय कर्मचाऱ्यांनी या आरोपी वस्तूंच्या तपासणी केली आणि त्यावेळी त्यांच्या वस्तूमध्ये सोने सापडले.तर दोन जण या प्रवाशांकडून सोन्याचा पुरवठा घेण्यासाठी आले होते आणि विमानतळाबाहेर त्यांची वाट पाहत होते. त्यानंतर डीआरआय कर्मचाऱ्यांनी साफळा रचला आणि दोन विमान प्रवाशासह या दोघांना अटक केली.

ऑक्टोबर महिन्यातही महसूल गुप्तचर संचालनालयाने सोने तस्करांना अटक केली होती. सोने तस्करी करणाऱ्या ३ भारतीय सोनारांसह ४ केनिया महिला आणि एक टांझानियन महिलांच्या टोळीचा 'डीआरआय'ने पर्दाफाश केला होता. आफ्रिकन देशातून भारतात सोने तस्करी करणाऱ्या एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तस्करी करणाऱ्यांवर महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे.

Gold smugglers
Navi Mumbai Crime: ११ वर्षांनी मोठी प्रेयसी, लग्नाचा हट्ट आणि आक्षेपार्ह फोटो; प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com