Dharashiv Crime: 'गावचे बाप आम्हीच', तिघांकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार; आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी

Crime News Dharashiv : धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींमधील एक जण या मुलीचा प्रियकर आहे. या घटनेमुळे धाराशिव हादरले आहे.
Dharashiv Crime
Dharashiv CrimeSaam Tv
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव

धाराशिवमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांसह कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी देत आरोपींनी या मुलीवर बलात्कार केला. आरोपींमधील एक जण या मुलीचा प्रियकर आहे. लग्नाचे आमिष दाखवून आधी या तरुणाने या मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर लग्नाबाबत बोलायचं आहे असं म्हणत तिला घेऊन गेला. त्याठिकाणी आरोपींनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेमुळे धाराशिव हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी नववीमध्ये शिकते. या तरुणीला गावातील एका तरुणाने लग्नाचे आमीष दाखवले. हा तरुण आपल्यावर खरं प्रेम करतो असं तिला वाटले होते. या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून २९ एप्रिल ते १६ जून २०२५ दरम्यान पीडित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर १६ जूनला या तरुणाने गावात राहणाऱ्या त्याच्या दोन मित्रांसह या मुलीला शेतात घेऊन जाऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

Dharashiv Crime
Crime News : 'लांब हो, मला हात लावू नको'; लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने धमकी दिली, कारण ऐकून नवऱ्याच्या टाळकं फिरलं अन्...

तर घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास तुला, वडील आणि चुलत्यांना ठार मारण्याची धमकी आरोपींनी पीडितेला दिली. हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात तिन्ही नराधमांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Dharashiv Crime
Crime: १९ वर्षीय तरुणीला बिल्डिंगच्या टेरेसवरून फेकलं; तरुणाचं धक्कादायक कृत्य, बहिणीनं सगळं खरं खरं सांगितलं

पीडित मुलगी नववीमध्ये शिकते. शाळेत जाता येता तिची गावातील एका तरुणासोबत ओळख झाली. ह्या तरुणाने तिला 'माझा तुझ्यावर जीव आहे. मला तू खूप आवडते. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे.', असे सांगितले. ही मुलगी देखील त्याच्याशी फोनवर सतत बोलत होती. आरोपीने या मुलीवर अनेकदा शरीरसंबंध ठेवले. पण एक दिवस त्याने त्याच्या दोन मित्रांसोबत या मुलीला शेतात घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपींनी तिला 'आम्ही गावचे बाप असून गावात आमची दहशत आहे. तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकू.', अशी धमकी आरोपींनी तिला दिली होती.

Dharashiv Crime
Crime: पिंपरीमध्ये रक्तरंजित थरार, अनैतिक संबंधातून दोघांची निर्घृण हत्या, आधी डोक्यात दगड घातला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com