

दिल्ली कालकाजी मंदिर परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
१७ वर्षीय मुलगी कालकाजी मंदिरात दर्शनासाठी गेली होती
पोलिस असल्याचे भासवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला अटक
दिल्ली सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुन्हा हादरली आहे. दिल्लीतील कालकाजी मंदिरामध्ये दर्सनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मंदिर परिसरात तिघांनी सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांनी दक्षिण-पूर्व दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात झालेल्या चकमकीनंतर एका गुन्हेगाराला अटक केली. संशयिताचे नाव आसिफ असून तो ओखला मंडीमध्ये काम करतो.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कालकाजी मंदिराच्या जवळ एका १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही अल्पवयीन मुलगी सोमवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिच्या १७ वर्षीय मैत्रिणीसोबत कालकाजी मंदिरात गेली होती. मंदिरात जाऊन आल्यानंतर त्या दोघी संध्याकाळी ७:३० च्या सुमारास जवळच्या आस्था कुंज पार्कमध्ये गेल्या होत्या.
पार्कमध्ये बसले असता त्या ठिकाणी २५ ते ३० वयोगटातील तीन तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगून त्या दोन अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू केली. त्यानंतर त्यांनी त्यांना धमकावले. आरोपींपैकी एकाने अल्पवयीन मुलाला पकडले आणि त्यानंतर त्या तिघांनी मिळून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
पोलिसांनी सांगितले की, त्यांना रात्री ८:४५ च्या सुमारास पार्कमधून एक पीसीआर कॉल आला ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ त्या अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तोपर्यंत तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. दिल्ली पोलिसांनी पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांनुसार तिन्ह आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
पोलिस आरोपींची ओळख पटवण्यासाठी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. पोलिस घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांकडूनही घटनेबद्दल माहिती गोळा करत आहेत. सध्या आरोपींना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. पोलिसांनी काल रात्री एका चकमकीत एका आरोपीला अटक केली. उर्वरित दोन आरोपींना पकडण्यासाठी पोलिस छापे टाकत असून अटक केलेला आरोपी आसिफकडून इतर दोन तरुणांविषयी माहितीही मिळवत आहेत. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.