Railway Crime: धावत्या मेमू लोकलमधून महिलेला ढकललं; सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडला हत्येचा थरार

Women Pushed From Moving Train : धावत्या मेमू लोकल ट्रेनमधून एका महिलेला खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येचे गूढ उकलण्यात आणि तपासात मदत करण्यात सीसीटीव्ही फुटेजने महत्त्वाची भूमिका बजावली.
Women Pushed From Moving Train
woman pushed from moving MEMU local trainsaam tv
Published On
Summary
  • धावत्या मेमू लोकलमधून महिलेला ढकलून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

  • घटना ग्राम गणखैरा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर घडली.

  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला.

धावत्या मेमू लोकल रेल्वेतून महिलेला ढकलून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या दरम्यान ग्राम गणखैरा येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पोल क्रमांक १००९/१५ समोरील रेल्वे ट्रॅकवर हा प्रकार घडला. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या या प्रकारात सुरुवातीला अपघाती मृत्यू मानले जात होतं. मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे धक्कादायक बाब उघडकीस आली.

रितू विनायक धमगाये (४३, रा. गणखैरा, गोरेगाव) , असे मृत महिलेच नाव आहे. रितू धमगाये या गोंदिया-वडसा मेमू लोकल (क्रमांक ६८८०६) मधून प्रवास करत होत्या. कामावरून घरी परतण्यास उशीर झाल्याने तिचा भाऊ मंगेश विनायक धमगाये हा थेट तिचा शोध घेतला. त्यावेळी गुरुवारी गणखैरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाशेजारी रितूचा मृतदेह आढळला . त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला.

Women Pushed From Moving Train
नेपाळमध्ये पुन्हा तरुणांच्या आंदोलनाचा भडका! शाहांच्या राजीनाम्याची मागणी

तपासादरम्यान शुक्रवारी येथील रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केलीय. त्यात एक अनोळखी व्यक्तीने रितू धमगाये यांचा हात जबरदस्तीने पकडला होता. तो व्यक्ती धावत्या मेमू लोकलच्या डाव्या बाजूच्या दारातून रितू यांना बाहेर ढकलत असल्याचे सीसीटीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसलं.

Women Pushed From Moving Train
Crime News : मुलीजवळ आला पॅन्टची चैन उघडली अन्...; बसमध्ये तरुणाचं किळसवाणं कृत्य

सीसीटीव्हीतील आरोपीचे वर्णनही पोलिसांनी जाहीर केले आहे. पोलिसांच्या वर्णनांवरून आरोपीचा बांधा मजबूत आहे, तर आरोपीचा सावळा वर्ण, काळे केस, काळा टी-शर्ट, काळी पँट, गळ्यात केशरी रंगाचा दुपट्टा, चेहऱ्यावर दाढी-मिशी तसेच त्याचे वय ४० ते ४५ वर्षे असल्याचे दिसते.

धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या

काही दिवसापूर्वी मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली होती. 22 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाली होती. लोकलमधील किरकोळ वाद हत्येपर्यंत पोहचला होता. मयांक लोहार असं खून झालेल्या तरुणाचे नाव होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com