Crime News : मुलीजवळ आला पॅन्टची चैन उघडली अन्...; बसमध्ये तरुणाचं किळसवाणं कृत्य

Madhya Pradesh Crime : मध्य प्रदेशातल्या देवरी जवळच्या बसमध्ये एका तरुणीशी गैरवर्तनाचा प्रयत्न झाला. तरुणीने धाडसाने आरोपीला चापट मारत प्रतिकार केला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
Bus Misconduct Attempt
Bus Misconduct Attemptgoogle
Published On

मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातील देवरी येथे महिला सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करणारी एक घटना समोर आली आहे. देवरी बसस्थानकावर उभी असलेल्या एका प्रवासी बसमध्ये एका तरुणाने प्रवास करणाऱ्या तरुणीशी अयोग्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने धैर्य दाखवत तात्काळ त्याला विरोध केला आणि त्याच्या वर्तनाचा निषेध करत त्याला चापट मारली. त्यानंतर संबंधित तरुण बसमधून खाली उतरून तिथून निघून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रवासी बसत असताना संबंधित तरुण बसमध्ये चढला. बसमध्ये पुढच्या बाजुला दोन तरुणी बसल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत तो सतत त्यांच्याजवळ येत होता. काही वेळाने त्याने एका तरुणीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.

Bus Misconduct Attempt
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

या प्रकारामुळे तरुणीला अस्वस्थ वाटलं. सुरुवातीला तिने स्वत: ला लांब करण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित तरुणाने आपलं वर्तन न बदलल्याने तिने धाडसाने त्याला थांबवलं आणि त्याच्या वर्तनाला निषेध करत चापट मारली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बसमधले इतर प्रवासीसुद्धा सतर्क झाले. त्यानंतर संबंधित तरुण तिथून पळून गेला.

ही संपूर्ण घटना बसमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. फुटेज समोर आल्यानंतरदेवरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप तरुणी किंवा तिच्या कुटुंबीयांनी लेखी तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे उपलब्ध कायदेशीर तरतुदींनुसार प्राथमिक स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसंबंधित घटनांकडे गांभीर्याने पाहिलं जाईल आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Bus Misconduct Attempt
Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचा भन्नाट फॉर्म्युला! एवढीच गुंतवणूक करा आणि मिळवा ₹50 लाख
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com