Solapur : सोलापुर हादरलं! प्रायव्हेट फोटो दाखवून ब्लॅकमेल, बलात्कार करून धर्मांतर केलं, अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ

Solapur Crime News : सोलापुरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचं धर्मांतर करून लग्न लावण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर २ आरोपी फरार आहेत.
Solapur : सोलापुर हादरलं! प्रायव्हेट फोटो दाखवून ब्लॅकमेल, बलात्कार करून धर्मांतर केलं, अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ
Solapur Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • सोलापुरात अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत बलात्कार

  • धर्मांतर करून लग्न करण्यात आलं

  • लग्नानंतर पीडितेचा अमानुष छळ

  • ५ जणांवर गुन्हा दाखल, ३जण अटकेत, २ फरार

सोलापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तीच जबरदस्तीने धर्मांतर करत लग्न करण्यात आलं आहे. या संतापजनक प्रकरणात संबंधित वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. इजराईल शेख, उजेब शेख, ऍड. अब्दुल्ला खतीब अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेतील आरोपी इजराईल शेख हा पीडित अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता. डिसेंबर २०२४ मध्ये त्याने पीडित मुलीचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ मिळवत तिला ब्लॅकमेल केलं. त्यानंतर मित्र उजेब शेख याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

Solapur : सोलापुर हादरलं! प्रायव्हेट फोटो दाखवून ब्लॅकमेल, बलात्कार करून धर्मांतर केलं, अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ
Online Shopping Fraud : स्वस्त साडी घेणं महागात पडलं! भुलथापांना बळी पडली अन् खातं रिकामं झालं, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

डिसेंबर २०२५ मध्ये पीडित मुलीला आरोपी इजराईलने लग्नाचे आमिष दाखवत तिला शहर काझी कार्यालयात नेलं. इथे ऍड. अब्दुल्ला खतीब याने लग्नासाठी धर्मांतर आवश्यक असल्याचे सांगत काही कागदपत्रावर तीची सही घेतली. दरम्यान जबरदस्तीने धर्मांतर करत तीचे लग्न लावल्यावर तिला काही महिने कर्नाटकातील कलबुर्गी येथे ठेवण्यात आलं.

Solapur : सोलापुर हादरलं! प्रायव्हेट फोटो दाखवून ब्लॅकमेल, बलात्कार करून धर्मांतर केलं, अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ
Kokan Railway News : आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? मुंबईतून विशेष ट्रेन धावणार, वेळापत्रक काय? तिकीट बुकिंग कधी करता येणार?

मात्र त्या ठिकाणी आरोपीचे आतेभाऊ आणि त्याच्या आईने पीडित मुलीला मारहाण केली, उपाशी ठेवून छळ केला असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीनंतर सोलापुरातील विजापूर रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तिघांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com