संसाराचा गाडा हाकताना पत्नी-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, तर काही वेळा वाद विकोपालाही जातात. ज्यामुळे गंभीर गुन्हे घडतात. अशीच एक घटना छत्तीसगड येथे घडली आहे. पतीने जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्याच पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून हत्या केली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील बसंतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोदनपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या हत्येनंतर पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला आणि तिच्या पतीचा साधारण नऊ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. लग्नाच्या चार वर्षापर्यंत दोघांचा संसार चांगला सुरू होता, मात्र त्यानंतर आरोपी पतीस दारूचे व्यसन जडले होते. दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून ती आपल्या मुलींना घेऊन माहेरी गोवर्धनपूर येथे आली.
नेहा सोन्हा (वय २८) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती पीडितेच्या आईला मिळाली. २० नोव्हेंबर रोजी पीडितेला गंभीर जखमी अवस्थेत नजीकच्या अंबिकापूर येथील मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यानच पीडितेचा मृत्यू झाला. रूग्णालय प्रशासन तसंच स्थानिक पोलिसांनी पंचनामा आणि शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांकडे दिला. पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळ वड्राफनगर पोलीस ठाण्यात जावयाविरूद्ध तक्रार दाखल केली.
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जावई कायम दारूच्या नशेत मारहाण करत असल्याने त्याविरोधात वड्राफनगर पोलीस ठाण्यात तक्रात दाखल केली होती. परंतु, पुन्हा आमच्या मुलीला मारहाण करणार नाही असा शब्द दिल्यावर त्याला सोडून देण्यात आले. मात्र तरीही तो मारहाण करत असल्याने ती माहेरी आली होती.
दिवाळीतच केलं काळं कृत्य
साधारण ३ वर्षांपासून ती माहेरीच होती, जावयाने तिला परत सासरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला नाही. दिवाळीच्या काही महिने आधी आरोपी तिच्या संपर्कात आला. त्यांच्यात बोलणे होऊ लागले. दिवाळीपूर्वी तो घरी आला आणि पत्नीला घेऊन मदनपूरच्या घरी गेला. घटनेच्या दिवशी नराधमाने दारूच्या नशेत पीडितेला मारहाण केली. हातपाय बांधून तिला पेटवून दिले.
पीडितेने आरडाओरड सुरू केली. शेजाऱ्यांनी धाव घेतली. आग लागल्याचे त्यांनी पाहिले. शेजाऱ्यांनी तात्काळ घरात जाऊन आग आटोक्यात आणली. त्याचवेळी आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान याबाबतचा अधिक तपास बलरामपूर पोलीस करत आहेत. तसंच फरार आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे बलरामपूर जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.