VIDEO : JCBने कोरलं, फावड्यांनी माती काढली, खड्डा खोदताना काळ आला; अंगावर मलबा पडून मुकुंदा यांनी जीव गमावला

Chhatrapati Sambhajinagar One Person Dies Falling Debris : छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रेनेजसाठी खड्डा खोदताना अचानक बाजूचा मलबा अंगावर पडून क्षणार्धात एका कामगाराचा दबून मृत्यू झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar One Person Dies Falling Debris
Chhatrapati Sambhajinagar One Person Dies Falling DebrisSaam Tv News
Published On

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रेनेजसाठी खड्डा खोदताना अचानक बाजूचा मलबा अंगावर पडून क्षणार्धात एका कामगाराचा दबून मृत्यू झाला आहे. १७ जून रोजी दुपारी काबरानगरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. मुकुंद दगडू साळवे असं मृताचं नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. मुकुंद साळवे कंत्राटदारामार्फत महापालिकेच्या ड्रेनेज खोदकाम करत होते. काबरानगर, जवाहरनगरमध्ये ड्रेनेज लाइन खोदताना मलबा त्यांच्या अंगावर पडला. त्याठिकाणी मातीवर विटा, पाण्याने भरलेली टाकी ठेवली होती. टाकीखाली माती ढासळली आणि गज लाकडासह मलबा साळवे यांच्या अंगावर पडला. त्यात काही लाकडी साहित्यही पडल्याने तो बाजूला करण्यात वेळ झाला. मलबा जेव्हा अंगावर पडला तेव्हा तातडीने ते जेसीबीच्या साहाय्याने देखील हटवण्याचा प्रयत्न केला. बाहेर काढल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना गजानन मंदिर परिसरातील खासगी रुग्णालयात नेलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केलं. तोपर्यंत साळवे यांचा मृत्यू झाला होता. साळवे यांच्या अंगावर मलबा पडण्याचा हा सगळा प्रकार बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पैशांसाठी कंपनीत गेला अन् दारातच उचललं धक्कादायक पाऊल

बीडमधील गेवराई शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. गेवराई शहरातील छत्रपती मल्टिस्टेट येथे एका शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. मल्टिस्टेटकडून खात्यातील पैसे मिळत नसल्याने हतबल झाल्याने शेतकऱ्याने कठोर पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर छत्रपती मल्टिस्टेटच्या संचालकावर कारवाई व्हावी अशी मागणी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar One Person Dies Falling Debris
Raj-Uddhav Thackeray Alliance : राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार, आज शिवसेना मेळाव्यात घोषणा होण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती मल्टिस्टेटच्या दारात एका शेतकऱ्याने गळफास घेतला. अल्पभूधारक शेतकऱ्याने मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव व्हावी म्हणून गावाकडील शेती विकून आलेली रक्कम मल्टिस्टेटमध्ये ठेवली होती. आता पैशांची गरज भासल्याने त्याने मल्टिस्टेटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण पैसे न मिळाल्याने मानसिक त्रासाने शेतकऱ्याने आपले जीवन संपवलं.

सुरेश आत्माराम जाधव असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी अकरा लाख रुपये छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठेवले होते. शाखेत सतत चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने हतबल झाल्याने जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी पैशांची गरज होती. त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळत नव्हते.

Chhatrapati Sambhajinagar One Person Dies Falling Debris
तिसऱ्या मजल्याच्या कॉरिडोरमध्ये फिरताना दिसली, आत्महत्येचा CCTV समोर; साठ्ये कॉलेजमधील तरुणीने इमारतीवरुन उडी घेतली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com