
मुंबई : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी आयटी पार्कमध्ये एका तरुणीने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेला महिना उलटत नाही तोवर मु्ंबईत देखील अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध साठ्ये कॉलेजमध्ये एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संध्या पाठक असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून तिने कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे. मात्र, आमच्या मुलीनं आत्महत्या केली नसून तिचा घातपात झालेला असू शकतो, अशी शक्यता संध्या पाठकच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संध्या पाठक ही साठ्ये कॉलेजमध्ये स्टॅटिस्टिक्स विभागात तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. संध्या नेहमीप्रमाणे आज सकाळी कॉलेजला आली होती. मात्र, सकाळच्या सुमारास तिने अचानक कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. यावेळी गंभीर जखमी झालेल्या संध्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिने प्राण सोडले. या घटनेनंतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये खळबळ उडाली. कॉलेज प्रशासनाकडून याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. संध्या पाठकने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याचं कॉलेजकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, 'आमची मुलगी असं करू शकत नाही, तिचा घातपात झालेला असू शकतो,' अशी भीती पाठक कुटुंबाने व्यक्त केली आहे.
संध्या तिसऱ्या मजल्याच्या कॉरिडोरमध्ये फिरताना दिसली
प्राथमिक माहितीनुसार, संध्या ही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिने असं टोकाचं पाऊल का उचललं असावं? याचा पोलीस तपास करत आहेत. तपासादरम्यान, पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि यात संध्या तिसऱ्या मजल्याच्या कॉरिडोरमध्ये फिरताना दिसत आहे. दरम्यान, साठ्ये कॉलेज हे मुंबईतील एक प्रतिष्ठित कॉलेज असून या कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने उडी मारून आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून संध्या पाठकने खरंच आत्महत्या केली की तिच्यासोबत इतर काही प्रकार घडला? याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.