Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! शेतीचा वादातून केलेल्या बेदम मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक

Maharashtra Breaking News: शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! शेतीचा वादातून केलेल्या बेदम मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक
Chhatrapati Sambhajinagar Crime:Saamtv
Published On

छत्रपती संभाजीनगर, ता. ६ जून २०२४

शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात झालेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपींना ताब्यात घेणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्र मृताच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतीच्या वादातून ५ ते ६ जणांनी केलेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातल्या गाढेपिंपळगाव येथे घडली. पेत्रास हरकु सोनवणे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काल (बुधवार, ता. ५) दुपारी १-२ च्या दरम्यान शेतीवरुन वाद झाला.

यावेळी सोनवणे यांना ५-६ जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला तसेच पायाला गंभीर इजा झाल्या होत्या. घटनेनंतर जखमी अवस्थेत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! शेतीचा वादातून केलेल्या बेदम मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक
Maharashtra Politics: लोकसभेतल्या अपयशामुळे राज्यात महायुतीत फूट? विधानसभेसाठी भाजपची एकला चलोची भूमिका?

दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह स्विकारणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! शेतीचा वादातून केलेल्या बेदम मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक
Sanjay Raut News: राजीनामा कशाला देताय, जनतेनेच तुम्हाला घरी बसवलंय; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com