चंद्रपुरात धक्कादायक घटनासमोर आली आहे. चंद्रपूर शहरात ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शहरप्रमुखाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपुरातील उच्चभ्रू सरकारनगर भागात धारदार शस्त्राने वार करत शहरप्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. शिवा वझरकर असे हत्या करण्यात आलेल्या शहरप्रमुखाचे नाव आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय शिवा वझरकर यांची चंद्रपुरातील सरकारनगर भागात धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या करण्यात आली. वझरकर यांचा मृतदेह त्यांच्याच मित्राच्या कार्यालयाजवळ सापडल्याने परिसरात एकच तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर वझकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या वाहनांची नासधूस केली.
पोलीस विभाग प्रजाकसत्ताक दिनाच्या हायअलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वझकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात रवाना करण्यात आला.
घटनास्थळी ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते. मित्रांशी झालेल्या वादाचे रुपांतर हत्येत झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यत घेण्यासाठी अभियान सुरु केले आहे.
या प्रकरणावरून ठाकरे गटाने आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. परिसरात युवा नेत्याची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वझरकर यांच्या हत्येने ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.