Nagpur Crime News: लाचखोरी प्रकरणी केंद्र सरकारच्या दोन अधिकाऱ्यांना अटक; CBI कारवाईत 2.15 कोटींचा मुद्देमाल जप्त

CBI Arrested Central Government Officers: एका अधिकाऱ्याच्या घरात 90 लाख रुपये सापडले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील खाजगी व्यक्तीकडून प्रियदर्शन देशपांडे यांच्या घरातून 1.25 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत.
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam TV
Published On

Bribe News:

नागपुरमधून (Nagpur) एक खळबळजनक बातमी समरो आलीये. CBI ने लाचखोरीच्या आरोपाखाली केंद्र सरकारच्या PESO (Petroleum and Safety Organization) दोन अधिकाऱ्यांसह चौघांना अटक केलीये. सीबीआयने घराची झाडाझडती घेतली असता आतापर्यंत 2.15 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nagpur Crime News
Crime News In Nagapur : शिक्षक झाला हैवान! शाळेतील अल्पवयीन मुलीवर सलग ६ महिने अत्याचार; नागपुरमधील संतापजनक घटना

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एका अधिकाऱ्याच्या घरात 90 लाख रुपये सापडले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील खाजगी व्यक्तीकडून प्रियदर्शन देशपांडे यांच्या घरातून 1.25 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. नागपुरच्या लक्ष्मीनगर येथील प्रियदर्शन दिनकर देशपांडे आणि मेसर्स सुपर शिवशक्ती केमिकलचे संचालक देवी सिंग कछवाह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

यासह राजस्थान येथील रहिवासी असलेले देवी सिंग यांच्याकडून 10 लाख रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. सीबीआयने काल सेमिनरी हिल्स येथील पेसो कार्यालयाजवळ टायपिंग सेंटरवर सापळा रचत ही कारवाई केली आहे. राजस्थानच्या चित्तोगडमध्ये असलेल्या स्फोटक कंपनीत तयार होणारे इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरची निर्मिती क्षमता वाढवून देण्यासाठी ही लाच घेतल्याचा आरोप आहे.

2 लाखाची लाच घेतांना पीएफ आयुक्तासह दोन जण ताब्यात

या आधी नाशिकमध्ये देखील अशाच एका घटनेचा सीबीआयने पर्दाफाश केला होता. २९ डिसेंबर रोजी सीबीआयने प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि अन्य दोन जणांना दोन लाखाच्या लाच प्रकरणात अटक केली होती. भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला दोन लाखाची लाच घेताना कारवाई केली होती.

Nagpur Crime News
Mumbai Crime News : नैराश्यामुळं तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल; 14व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com