Shocking Crime News : प्रेम, लग्न, धोका आणि हत्या...; बायकोचं मुंडकं छाटून नवरा पोलीस स्टेशनमध्ये, 'त्याच्याशी' बेडरुममध्ये संबंध अन्...

Crime News : ही घटना बंगळुरुतील चांदापुरा जवळील हीलालागे गावातील आहे. दरम्यान, आरोपीचे नाव शंकर असून त्याचं वय २८ आहे. तर मृत पत्नी मनसाचे वय २६ असून ती बेब्बागोडी येथील राहिवासी होती.
Crime News
Crime NewsSaam Tv News
Published On

चांदापुरा : बेंगळुरुत एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच आपल्याच पत्नीनी निर्घृणपणे हत्या केली आहे. पतीनेच आपल्या पत्नीचा चिरलेला गळा पोलीस ठाण्यात नेला आणि खून केल्याची कबुली दिली आहे, ज्यामुळे आता पोलीस अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यासंबंधित आता पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बेंगळुरुतील चांदापुरा जवळील हीलालागे गावातील आहे. दरम्यान, आरोपीचे नाव शंकर असून त्याचं वय २८ आहे. तर मृत पत्नी मनसाचे वय २६ असून ती बेब्बागोडी येथील राहिवासी होती. दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. काही काळ ते भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान, शंकर हा कामानिमित्त गेल्यानंतर रात्री उशीरा घरी परतला असताना ही घटना घडली आहे. त्याने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत पाहिले. त्यानंतर दोघांमध्ये वादंग निर्माण झाला. शंकरने दोघांनाही मारहाण केली, त्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा गळा चिरत खून केला. शंकरने केलेल्या कृत्यावर पोलीस चक्रावून गेले.

Crime News
Ladki Bahin Yojana : तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही? ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा, अन्यथा...

दरम्यान, या घटनेत पोलिसांसमोर आरोपी सरेंडर झाला आणि सांगितलं की, त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली. याचपार्श्वभूमीवर पोलिसांचे म्हणणं आहे की, शंकर आणि मनसा यांच्यात वारंवार वादविवाद व्हायचा. मनसाला शंकरपासून वेगळं व्हायचं होतं. तिने अनेकदा शंकरला मानसिक त्रासही दिला होता. गुरुवारी रात्री ती पुन्हा घरी आल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर ही घटना घडली. सूर्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. मनसासोबत तरुण नेमका कोण होता? याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी जाऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.

Crime News
Maharashtra Politics : आषाढी एकादशीला राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ, शरद पवार-अजितदादा एकत्र येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com