Maharashtra Politics : आषाढी एकादशीला राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ, शरद पवार-अजितदादा एकत्र येणार?

Maharashtra Politics : 'पांडूरंगाची इच्छा असली तर बहिण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. १० तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा'. मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे मिटकरींनी सुतोवाच केलं आहे.
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSaam Tv News
Published On

अक्षय गवळी, साम टिव्ही

अकोला : दोन्ही राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. 'पांडूरंगाची इच्छा असली तर बहिण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात. १० तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा'. मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे मिटकरींनी सुतोवाच केलं आहे. पांडूरंगाची इच्छा असली तर आषाढीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं मिटकरींनी भाकीत केलं आहे.

मिटकरी पुढे म्हणाले की, 'दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. मध्यंतरी विरोध असल्याच्या बातम्या चालवल्या होत्या. पण तसा कुणाचाही कुठलाही विरोध नाही. शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आहेत. अजित पवार आणि पवार साहेब जोही आदेश देणार, तो आमच्यासाठी सर्वोच्च असणार. आज भागवत एकादशी आहे, त्यानिमित्याने बोलतोय. पांडुरंगाच्या मनात असलं तर आषाढी एकादशीचा मुहूर्तचं कशाला? कुठलाही मुहूर्त असू शकतो', असं म्हणत अमोल मिटकरींनी शरद पवार आणि अजितदादा यांच्या एकत्र येण्यावर सूचक विधान केलंय.

Sharad Pawar and Ajit Pawar
लक्षात ठेवा, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय; नितेश राणेंचा रोख कुणाकडे?

तसेच त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरही मोठं विधान केलंय. ते म्हणाले की, 'दोन्ही भावांनी एकत्र यावं हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. जर दोघे भाऊ एकत्र आले तर, त्यांच्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास मराठी माणसांची ताकद वाढणार. त्यांच्या एकत्र येण्याचा महायुतीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचा' दावा देखील मिटकरी यांनी यावेळी केलाय.

'कुणालाही कमजोर समजू नये. दोघे भाऊ एकत्र आल्यास निश्चितच मराठी माणसाची ताकद वाढणार. निश्चितच एकत्र आल्यावर राजकीय समीकरणे बदलणार अर्थातच परिणाम होणार. दोघे भाऊ एकत्र येत असल्यास त्यांच्या आणि मराठी माणसाच्या मुंबईच्या दृष्टीने राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, त्यांच्या एकत्र येण्यानं महायुतीवर काही परिणाम होईल, असं वाटत नाही', असंही मिटकरींनी स्पष्ट केलं.

Sharad Pawar and Ajit Pawar
लक्षात ठेवा, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय; नितेश राणेंचा रोख कुणाकडे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com