

बीडमध्ये विद्यार्थिनीने अत्याचाराचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना.
धावत्या रिक्षामध्ये छेडछाड झाल्याची तक्रार तपासात खोटी ठरली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपासात सत्य उघड.
योगेश काशिद, साम प्रतिनिधी
बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. धावत्या रिक्षामध्ये एका विद्यार्थिनीची लैंगिक छेड काढल्याच्या घटनेने पोलिसांसह शहरातील नागरिकांना चक्रावून सोडलंय. शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत धावत्या रिक्षामध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा तपास पोलीस करत होते, मात्र सत्य काही वेगळंच निघाले.
घटनेचा तपास करताना समोर आलेल्या सत्यामुळे पोलिसांना मोठा धक्का बसलाय. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा बनाव रचल्याची बाब तपासत उघडकीस आली आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका विद्यार्थिनीने स्वतःवर अत्याचार झाल्याचा बनाव केल्याची घटना उघडकीस आल्यानं अनेकांना धक्का बसलाय. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने अत्याचार झाल्याचा बनाव रचला होता.
चालत्या रिक्षामध्ये लैंगिक छेडछाड आणि अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार या विद्यार्थिनीने पोलिसात केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. घटनेचा तपास करताना पोलिसांना मोठा धक्का बसलाय. कारण पोलीस अशा प्रकरणाचा तपास करत होते, जो कधी घडलाच नव्हता. पोलिस तपासात अत्याचार झाल्याचा प्रकार घडलाच नसल्याचे उघडकीस आले आहे. विद्यार्थिनीने काल्पनिकपणे कथा रंगवत पोलिसात तक्रार दाखल केली होती.
२६ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी नगर येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने लैंगिक छेडछाड आणि अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिच्यासोबत हा प्रकार चालत्या रिक्षामध्ये घडला होता असं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू करण्यात आला. त्यावेळी पोलिसांना वेगळाच प्रकार असल्याचं समजलं. पोलीस अशा घटनेचा तपास करत होते, जी कधी घडचलेच नव्हते.
विद्यार्थिनीने काल्पनिकपणे कथा रचत पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जेव्हा तिला कारण विचारलं तेव्हा अनेकांचे डोके चक्रावून गेले. मालेगाव येथे एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची बातमी या विद्यार्थिनीने वाचली होती. ही विद्यार्थिनी त्या बातमीचा सतत विचार करत होती. डोक्यात सतत तेच विचार चालू होते. त्यावरूनच तिने हा बनाव रचला असं तिने कबूल केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.