Beed Crime: धुलवडीची पार्टी बेतली जिवावर! शेततळ्यात ढकलून देत मित्रानेच मित्राला संपवलं; बीडमध्ये खळबळ

Beed News: धूलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी शेतात पार्टी करायला गेलेल्या मित्रांमध्ये वाद झाल्याने वाद शेततळ्यात ढकलून देत खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या पवारवाडी येथे उघडकीस आला आहे.
Crime News
Crime NewsYandex

Beed Crime News:

धूलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी शेतात पार्टी करायला गेलेल्या मित्रांमध्ये वाद झाल्याने वाद शेततळ्यात ढकलून देत खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या पवारवाडी येथे उघडकीस आला आहे. कुंडलिक भीमराव धुमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News in Marathi)

नेमकं काय घडलं?

धूलिवंदनाच्या दिवशी सोमवार असल्याने अनेकांनी दुसऱ्या दिवशी पार्टी करण्याचे निश्चित केले होते. त्याप्रमाणे पवारवाडी येथील काही मित्रांनी मिळून अशोक खामकर यांच्या शेतात पार्टीचे आयोजन केले होते. दुपारी पार्टी करत असताना कुंडलिक भीमराव धुमाळ व संभा उर्फ महेश उत्तमराव मोरे यांच्यात बोलता बोलता वाद झाला.

यावेळी जवळच असलेल्या शेततळ्यात महेश मोरे याने कुंडलिकला तळ्यात ढकलून दिले. पाण्यात पडताच कुंडलीक घाबरला याचवेळी महेशने त्याच्या अंगावर उडी मारली. यामुळे पाण्यात खाली बुडून तोंडात व नाकात पाणी गेल्याने कुंडलिक याचा जागीच मृत्यू झाला.

Crime News
Buldhana News: प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीनंतर संजय गायकवाड यांची माघार; अर्ज भरण्याचेही सांगितले कारण...

दरम्यान मित्रांनी अचानक पाण्यात बुडून कुंडलिकचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र कुंडलिकला पोहता येत असल्याने त्याच्या कुटुंबियांनी बुडून मृत्यू होऊ शकत नाही, असा आक्षेप घेतला. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता कुंडलिक याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी महेश मोरे यास अटक केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crime News
Maharashtra Lok Sabha Election : 'मी लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार', प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर वसंत मोरेंचं वक्तव्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com