Akola Crime : कौटुंबिक वादातून नको ते केलं, बायकोसह पोटच्या चिमुकलीला संपवलं; महाराष्ट्र हादरला

Akola Husband Kills Wife and Daughter : मृत महिलेचं नाव अश्विनी सुरज गणवीर असून तिचं वय २५ वर्ष होतं. तर मृत चिमुकलीचं नाव आयशा गणवीर असून ती केवळ तीन वर्षांची होती.
Akola Husband Wife and daughter killed
Akola Husband Wife and daughter killedSaam Tv News
Published On

अकोला : अकोल्यात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नी आणि आपल्या पोटच्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोला शहरातील तारफैल भागात ही घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनेचा पंचनामा सुरु असून आरोपी पतीला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

मृत महिलेचं नाव अश्विनी सुरज गणवीर (वय २५) असं मृत बायकोचं नाव आहे. तर मृत चिमुकलीचं नाव आयशा गणवीर असून ती केवळ तीन वर्षांची होती. आरोपी सुरज गणवीर उर्फ गोट्या याने वादातून दोघांची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे. आरोपी तरुणास पोलिसांनी अटक केली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Akola Husband Wife and daughter killed
Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका, दारु ढोसून मर्सिडीज दामटावली, कीर्तनावरुन परताना तरुणाचा जीव गेला

लेकीच्या 'बर्थडे'लाच बापाची हत्या

दरम्यान, नाशकात देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकमेकांचे मित्र असूनही एका तडीपार गुंडासह त्याच्या साथीदाराने धारदार शस्त्राने वार करून दुसऱ्या तडीपार गुंडाची हत्या केल्याची घटना गुरुवारी १ मेला रात्री सव्वादहा वाजता जेलरोडच्या जुना सायखेडारोड भागातील बालाजीनगरात घडली.

हितेश सुभाष डोईफोडे असं मृताचं नाव आहे. हितेशचा मित्र रोहित नंदकिशोर बंग (वय २८) हा जखमी झाला असून, लपून बसल्यानं तो बचावला आहे. जखमी रोहितने दिलेल्या जबाबावरून नाशिकरोड पोलिसांनी संशयित नीलेश पेखळे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत काही तासात त्याला अटक केली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Akola Husband Wife and daughter killed
Sangli News : माझ्या बायकोशी गोड बोलून जवळीक साधली; सांगलीत ३ दिवसांचं बाळ चोरीला, आजोबांनी सांगितली कहाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com