RBI Polymer Notes : चलनातील १० आणि २० रुपयांच्या नोटा बंद होणार? RBI चा नवा प्लान काय? वाचा...

RBI currency update : आरबीआयने १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. अंतिम निर्णय अजून आलेला नसला तरी सुरक्षित आणि टिकाऊ नोटांच्या दिशेने हालचाल सरू आहे.
RBI Polymer Notes
RBI Polymer Notesgoogle
Published On

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) लवकरच १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पण सध्या कागदी नोटा बंद करण्याचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. RBI ची नोटा छापणारी कंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (BRBNMPL) यांनी प्लास्टिक नोटांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी जागतिक स्तरावर ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) मागवला आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या नोटांचा प्रकल्पाची हालचाल होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

सुरुवातीला १० आणि २० रुपयांच्या नोटांची पायलट चाचणी घेतली जाऊ शकते. या नोटा प्लास्टिक किंवा पॉलिमर फिल्मवर छापल्या जातात. त्यामध्ये असलेली पारदर्शक (Transparent ) सुरक्षा विंडो आणि आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे बनावट नोटा तयार करणं जास्त कठीण होतं. तसेच या नोटा पाण्यामुळे खराब होत नाहीत, लगेचच फाटत नाहीत आणि कागदी नोटांच्या तुलनेत अडीच ते चारपट जास्त टिकाऊ असल्याचं मानलं जातं.

RBI Polymer Notes
Indian Railways Tickets : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता 'या' तिकीटावर मिळणार ३% सूट

RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ५ जून २०२६ रोजी स्पष्ट केलं होतं की, पॉलिमर नोटांचा प्रस्ताव अजून सुरू आहे. अजून त्यावर कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. भारतात पॉलिमर नोटांचा प्रस्ताव नवीन नाही. २००९ पासून या विषयावर सुरू आहेत. या विषयावर चर्चा सुरू असून २०१२ मध्ये १० रुपयांच्या पॉलिमर नोटांची चाचणी घेण्याला मंजुरी दिलेली होती. मात्र तांत्रिक आणि कार्यालयातील काही अडचणींमळे हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नव्हता.

तज्ज्ञांच्या मते, देशात ऑनलाइन व्यवहार वाढले असले तरी चलनाचीही मागणी तितकीच आहे. त्यामुळे जास्त टिकाऊ आणि सुरक्षित नोटांचा पर्याय म्हणून पॉलिमर नोटांचा विचार केला जातो. पण या नोटांसाठी एटीएम, नोट मोजणी यंत्रणा आणि वेगवेगळ्या प्रणालींमध्ये बदल करावे लागू शकतात. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पॉलिमर नोटा टप्प्याटप्प्याने चलनात आणल्या जाण्याची शक्यता आहे.

RBI Polymer Notes
Gold Rate Today : चांदी तब्बल ₹2,000 ने स्वस्त! सुवर्णनगरीत सोन्याच्या दरातही झाला मोठा बदल; १ तोळ्याचा दर किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com