व्हॉट्सॲप शिवाय आपले जीवन अशक्य आहे. व्हॉट्सॲपमुळे आपण एकावेळी अनेकांशी जोडले जातो. व्हॉट्सॲप आपल्या युजर्सची नेहमी काळजी घेत असते. नवीन फिचर आणि अपडेट घेऊन येत असते. आता नुकतेच व्हॉट्सॲपने युजर्सच्या सुरक्षिततेसाठी ग्रुप मैसेजिंग मध्ये कॉन्टेक्स्ट कार्ड लाँच करण्यात आले आहे.
व्हॉट्सॲप दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आपल्या युजरच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेत आहे. व्हॉट्सॲपला नुकतेच एक नवीन अपडेट आले आहे. हे अपडेट युजरचे ग्रुप मेसेजिंग सुरक्षित राहण्यास मदत करेल. व्हॉट्सॲपमध्ये तुम्हाला अनोळखी व्यक्तीने एखाद्या ग्रुपमध्ये जोडले तर हे कॉन्टेक्स्ट कार्ड त्या ग्रुपबाबत तुम्हाला अधिक माहिती देईल. या माहिती मध्ये तुम्हाला ग्रुपमध्ये कोणी जोडले, ग्रुप कधी तयार करण्यात आला आणि कोणी तयार केला याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. या माहितीमुळे तुम्ही ग्रुपमध्ये राहायचे की ग्रुपमधून बाहेर पडायचे हे ठरवू शकता.
तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला नुकतेच भेटले असाल आणि त्यांचे फोन क्रमांक कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह केले नसल्यास हे अपडेट तुम्हाला ते कॉन्टॅक्ट्स उपलब्ध करून देईल. हे अपडेट व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना अनोळखी कॉल ओळखणे, चॅट लॉक करणे, ॲपमध्ये प्रायव्हसी जोपासणे, ग्रुपची सुरक्षितता या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवते. हे अपडेट तुम्हाला अनोळखी व्यक्तींकडून मेसेज किंवा कॉल आल्यास अधिक संदर्भ देईल. लवकरच हे अपडेट वापरकत्यांसाठी उपलब्ध होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.