2026 मध्ये WhatsApp चॅटिंगचा अंदाज बदलणार; जे लिहू त्याचा Sticker बनेल, आताच जाणून घ्या 3 स्मार्ट फीचर्स

WhatsApp New Features : व्हॉट्सॲप युजर्सना आनंदाची बातमी! व्हॉट्सॲपने नवीन मजेशीर फीचर्स लाँच केले आहेत. ज्यात तुम्ही जे लिहाल त्याचा sticker बनेल. सविस्तर माहिती वाचा.
WhatsApp New Features
WhatsApp yandex
Published On
Summary

व्हॉट्सॲपने ग्रुप चॅटसाठी तीन नवीन फीचर्स लाँच केले आहेत.

नवीन फीचर्समुळे ग्रुपमध्ये चांगले कनेक्शन , ओळख आणि मजेशीर संवाद राहील.

तुम्ही जे लिहाल त्याचा sticker बनेल.

मित्रांनो व्हॉट्सॲप चॅटिंग आता अधिकच सोपे आणि मजेशीर होणार आहे. नुकतेच व्हॉट्सॲपने नवीन भन्नाट फीचर्स घोषणा केले आहे. ज्यामुळे तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीशी मजेशीर संवाद साधू शकता. कंपनीने अलीकडेच ग्रुप चॅटचा अनुभव वाढविण्यासाठी तीन नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. याचा उद्देश ग्रुपमध्ये चांगले कनेक्शन, ओळख आणि नियोजन सुलभ व्हावे हे आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

व्हॉट्सॲप आता आपल्या वापरकर्त्यांना मेंबर टॅग्ज, टेक्स्ट स्टिकर्स आणि इव्हेंट रिमाइंडर्स यांसारखी तीन नवीन फीचर्स देत आहे. ज्यामुळे वापरकर्ते ग्रुपमध्ये अधिक सहजपणे कनेक्ट राहू शकतात आणि स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात. त्यांच्यातील संवाद अधिक सोपा झाला आहे. या फीचर्सचे वैशिष्ट्ये आणि त्यांचा वापर जाणून घेऊयात.

मेंबर टॅग्ज फीचर (Member Tags )

व्हॉट्सॲपने ग्रुप चॅटमध्ये मेंबर टॅग्ज फीचर सुरू केले आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या नावावर टॅग जोडता येतात. ज्यामुळे ग्रुपमधील इतर सदस्यांना त्यांची भूमिका, त्यांची ओळख सहज समजते. महत्त्वाचे म्हणजे, हे टॅग्ज प्रत्येक ग्रुपसाठी कस्टमाइज केले जाऊ शकतात.

WhatsApp New Features
लय भारी! आता Whatsapp स्टेटस ठेवताना नाही होणार चूक; मेटानं आणलं नवं फिचर

टेक्स्ट स्टिकर्स (Text Stickers)

व्हॉट्सॲपचे नवीन टेक्स्ट स्टिकर्स हे फीचर वापरताना वापरकर्त्यांना खूपच मजा येणार आहे. यामध्ये वापरकर्ते कोणताही शब्द स्टिकर सर्च बारमध्ये टाइप करून स्टिकरमध्ये बदलू शकतात. तयार केलेले टेक्स्ट स्टिकर्स थेट चॅटमध्ये पाठवता येतात किंवा त्यांच्या स्वतःच्या स्टिकर पॅकमध्ये सेव्ह करता येतात.

इव्हेंट रिमाइंडर्स (Event Reminders)

व्हॉट्सॲपमधील तिसरे नवीन फीचर म्हणजे इव्हेंट रिमाइंडर्स होय. जे तुम्ही ग्रुप चॅटमध्ये वापरू शकता. जेव्हा वापरकर्ते ग्रुपमध्ये एखादा कार्यक्रम तयार करतात, तेव्हा ते उपस्थितांसाठी एक कस्टम अर्ली रिमाइंडर सेट करू शकतात. हे तुम्हाला वेळेवर पार्टीला पोहोचण्यास किंवा कोणताही कार्यक्रमात वेळेवर सहभागी राहण्यास मदत करेल. ॲपमध्ये आधीच कार्यक्रम तयार करण्याची, त्यांना पिन करण्याची, RSVP गोळा करण्याची आणि अपडेट्स शेअर करण्याची क्षमता आहे.

टीप - तुम्हाला अद्याप ही फीचर्स मिळाली नसतील, तर लवकरच व्हॉट्सॲप अपडेटमध्ये ही नवीन फीचर्स मिळू शकतात.

WhatsApp New Features
Happy New Year! ऐन वेळी स्टेटस शोधू नका; 'इथे' वाचा WhatsApp-Facebook साठी मराठी, हिंदी आणि English शुभेच्छा मेसेज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com