WhatsApp Update: WhatsApp चं सर्वात मोठं अपडेट! यापुढे तुमचा नंबर दिसणार नाही, इन्स्टासारखं फक्त युजरनेम

WhatsApp Username : व्हॉट्सअ‍ॅपने मोठा बदल आणला आहे. आता मोबाईल नंबरशिवाय संपर्क साधता येणार. ‘युजरनेम रिझर्वेशन’ फीचरची चाचणी सुरू झाली असून वापरकर्त्यांना अधिक प्रायव्हसी मिळणार आहे.
WhatsApp update 2025
WhatsApp update 2025google
Published On

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या प्लॅटफॉर्मला आधुनिक करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलत आहे. नवीन Android बीटामध्ये युजरनेम रिझर्वेशन फीचरची चाचणी सुरू करण्यात आली आहे. या बदलामुळे लवकरच युजर्स मोबाईल नंबर न देता फक्त युजरनेमच्या आधारे संपर्क साधू शकतील, जसे की टेलिग्राममध्ये आधीपासूनच सुविधा आहे.

2009 पासून व्हॉट्सअ‍ॅपवर नोंदणी आणि संपर्कासाठी मोबाईल नंबर आवश्यक होता. मात्र आता युजरनेम प्रणालीमुळे युजर्सना त्यांच्या प्रोफाईलमध्ये आधी पेक्षा जास्त प्रायव्हसी मिळणार आहे. या फीचरच्या सध्याच्या बीटा चाचणीत युजर्सना आपल्या पसंतीचे युजरनेम आधीपासूनच रिझर्व्ह करण्याची संधी दिली जाणार आहे. यामुळे लोकप्रिय नावांची नोंदणी योग्य प्रकारे होईल आणि फीचरचा टप्प्याटप्प्याने बदल करताना कंपनीला सिस्टिमची क्षमता तपासता येईल.

WhatsApp update 2025
SIP Calculation: दर महिन्याला ₹६,००० गुंतवा अन् ₹५ लाख मिळवा, SIP कॅल्क्युलेशन एकदम सोप्या भाषेत

युजरनेमसाठी काही नियमदेखील निश्चित करण्यात आले आहेत. वापरकर्त्यांचा युजरनेम www.ने सुरू होता कामा नये, तसेच त्यात किमान एक अक्षर असणं आवश्यक आहे. फक्त अंक किंवा चिन्हे असलेले नाव मान्य होणार नाही. तसेच युजरनेममध्ये केवळ इंग्रजी अक्षरे (a to z), अंक (0–9), डॉट (.) आणि अंडरस्कोर (_) यांचा वापर करता येईल.

सध्या हे फीचर केवळ रिझर्वेशनसाठी उपलब्ध असला तरी, भविष्यात वापरकर्ते आपल्या युजरनेमच्या माध्यमातून थेट चॅट आणि कनेक्शन करू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपने या फीचरच्या अधिकृत लॉंचची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, बीटा आवृत्तीत त्याची उपस्थिती पाहता हा मोठा बदल लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

WhatsApp update 2025
Liver Cancer: भूक लागत नाहीये, डोळे पिवळे होतायेत? कावीळ नाही असू शकतो लिव्हर कॅन्सरचा धोका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com