SIP Calculation: दर महिन्याला ₹६,००० गुंतवा अन् ₹५ लाख मिळवा, SIP कॅल्क्युलेशन एकदम सोप्या भाषेत

Mutual Funds: दरमहा फक्त ₹६,००० SIP मध्ये गुंतवा आणि पाच वर्षांत ₹५ लाखांपर्यंत परतावा मिळवा. सोप्या भाषेत जाणून घ्या SIP कॅल्क्युलेशन आणि योग्य फंड निवडीचे मार्ग.
monthly SIP plan
SIP Calculation
Published on
monthly SIP plan
monthly SIP plangoogle

आजकाल लोक मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याला पहिले पसंत करत आहेत. कारण या फंडांच्या मदतीने भविष्यात आकर्षक परतावे मिळू शकतात.

monthly SIP plan
monthly SIP plangoogle

म्युच्युअल फंडांवरील अपेक्षित वार्षिक परतावा १२ ते १४ टक्क्यांच्या दरम्यान असतो. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी SIP म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन लोक निवडतात.

monthly SIP plan
monthly SIP plangoogle
Summary

जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांसाठी दरमहा ६,००० रुपयांची SIP केली, तर १२ टक्के वार्षिक परताव्यावर त्याला अंदाजे ४,९५,००० रुपयांची रक्कम मिळू शकतं. या कालावधीत त्याची मूळ गुंतवणूक ३,६०,००० रुपये असेल, तर सुमारे १,३५,००० रुपये नफा मिळेल.

SIP for 5 years
SIP for 5 yearsgoogle

योग्य फंड निवडणं हे केवळ परताव्याच्या इतिहासावर अवलंबून नसतं. फंड निवडताना गुंतवणुकीचे उद्दिष्ट, वेळेचा कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता या घटकांचा विचार करणं आवश्यक आहे.

mutual fund return
mutual fund returngoogle

दीर्घकालीन गुंतवणूक आणि उच्च जोखीम सहनशक्ती असलेल्यांसाठी इक्विटी फंड योग्य ठरतात, तर दोन ते तीन वर्षांसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हायब्रिड किंवा डेट फंड अधिक योग्य असतात.

6000 SIP return
monthly SIP plangoogle

याशिवाय, फंडाचे शुल्क, व्यवस्थापकांची कामगिरी आणि बाजारातील बदलांदरम्यान परताव्याचे स्थैर्यही पाहणे गरजेचे आहे. योग्य विश्लेषण केल्यास SIP गुंतवणूक दीर्घकाळात चांगले उत्पन्न देऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com