Inheritance Tax: 'वारसा कर' म्हणजे नेमकं काय रे भाऊ? भारतात काय तरतूद, सविस्तर घ्या जाणून

What Is Inheritance Tax: कॉंग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे वारसा कर पुन्हा चर्चेत आला आहे. आज आपण वारसा कर म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
What Is Inheritance Tax
What Is Inheritance TaxSaam Tv

कॉंग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे वारसा कर ( Inheritance Tax) पुन्हा चर्चेत आला आहे. वारसा कर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेवर लावला जाणारा कर आहे. तो वारसांना द्यावा लागतो. अनेक देशांमध्ये वारसा कर पन्नास टक्क्यांहून अधिक आहे. वारसा कराबद्दल भारतात काय तरतूद आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. भारतात सध्या वारसा कर लागू नाही.

इंग्रजीमध्ये वारसा कराला इन्हेरिटेंस टॅक्स आणि हिंदीमध्ये विरासत कर, असं संबोधलं जातं. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी वारसा करावर वक्तव्य केल्यामुळे चांगलाच राजकीय गोंधळ उडाला (What Is Inheritance Tax) आहे. यावरून काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची आणखी एक संधी भारतीय जनता पक्षाला मिळाली. दुसरीकडे सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

वारसा कर म्हणजे काय?

जपानमध्ये वारसा कर ५५ टक्के, दक्षिण कोरियामध्ये ५० टक्के, जर्मनीमध्ये ५० टक्के, फ्रान्समध्ये ४५ टक्के, इंग्लंड (यूके)मध्ये ४० टक्के, अमेरिकामध्ये (यूएस) ४० टक्के, स्पेनमध्ये ३४ टक्के तर आयर्लंडमध्ये हा कर ३३ टक्के (Income Tax) आहे.

वारसा कर हा प्रत्यक्षात मालमत्तेवर आकारला जाणारा कर ( Inheritance Tax In India) आहे. परंतु, तो संपत्ती कर नाहीये. अमेरिकेत वारसा कराचा प्रामुख्याने उल्लेख अनेकदा केला जातो. अमेरिकन व्याख्येनुसार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारसांना मिळणाऱ्या मालमत्तेवर हा कर आकारला जातो. विशेष म्हणजे वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता हस्तांतरित होण्यापूर्वी हा कर आकारला जातो.

What Is Inheritance Tax
Tax Saving Tips : ७ लाखांच्या टॅक्सवर करता येणार बचत, ITR फाइल करण्यापूर्वी ६ टिप्स लक्षात ठेवा

वारसा कर का लावला जातो?

आता प्रश्न पडतो की, वारसा कर का लावला जातो? असा कर लावण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश महसूल मिळवणे हा आहे. सरकारकडे पैसा आला की विकासकामांवर जास्त खर्च करता (Property Tax) येईल, देशाची प्रगती होईल हा हेतु त्यामागे आहे. समाजात अधिकाधिक भांडवल वितरित करणे, हा सरकारचा आणखी एक उद्देश आहे.

अमेरिकेत सध्या हा कर ४० टक्के आहे. यानुसार एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर जितकी रक्कम कमवली असेल, ती संपूर्ण रक्कम त्याच्या वारसांना मिळू शकत नाही. समजा एखाद्या व्यक्तीची मालमत्ता एक कोटी (Inheritance Tax In Detail) रूपये आहे. वारसा करानुसार त्या वक्तीच्या मृत्यूनंतर ती संपूर्ण रक्कम त्याच्या वारसांना मिळत नाही. ती संपत्ती किंवा रक्कम वारसांच्या नावे हस्तांतरित करण्यापूर्वी मालमत्तेवर ४० लाख रुपये कर आकारला जाईल. म्हणजे वारसांना फक्त ६० लाख रुपयांची मालमत्ता दिली जाईल. वारसांची संख्या २ किंवा ३ असल्यास प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या मालमत्तेच्या रकमेनुसार कर आकारला जातो, अशी माहिती न्युज१८ हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

What Is Inheritance Tax
Income Tax Return Form: तुमच्या उत्पन्नानुसार टॅक्स रिटर्नसाठी कोणता फॉर्म भरावा? जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com