Wakefit Sleep Internship: ८ तास झोपा अन् १० लाख कमवा, 'या' कंपनीने दिली अनोखी ऑफर

Wakefit Sleep Internship 2024: प्रत्येकाला ८-९ तासांची झोप ही पुरेशी असते. त्यामुळेच एका कंपनीने चक्क ८ तास झोपा अन् १० लाख रुपये कमवा अशी ऑफर दिली आहे.
Wakefit Sleep Internship
Wakefit Sleep InternshipSaam Tv
Published On

पुरेशी झोप घेणे हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. रोज ८-९ तास झोपायलाच हवे. परंतु रोजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी झोप मिळत नाही. परंतु जर तुम्हाला झोपण्याची नोकरी मिळाली तर? आश्चर्यच वाटेल ना. परंतु खरंच एक कंपनी झोपण्यासाठी लाखो रुपये देत आहे. वेकफीट ब्रँडने प्रोफेशनल स्लीप इंटर्न प्रोग्राम सुरु केला आहे. या इंटर्नशिपमध्ये इंटर्नला फक्त झोपायचे आहे.

वेकफीट कंपनीने त्यांच्या वेबसाइटवरुन या इंटर्नशिपबाबत माहिती दिली आहे. या कंपनीत प्रोफेशनल स्लीप इंटर्न या पदासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. वर्क फ्रॉम बेड म्हणजे तुम्हाला फक्त झोपायचे आहे. २ महिन्यांसाठी तुम्हाला ही इंटर्नशिप करायची आहे. म्हणजे दोन महिने रोज तुम्हाला ८ तास झोपायचे आहे. या इंटर्नशिपसाठी १ लाख ते १० लाख रुपयांची स्टायपेंड देण्यात येणार आहे.

Wakefit Sleep Internship
Success Story: गर्लफ्रेंडला देण्यासाठी ताजी फुले मिळाली नाहीत, तर पठ्ठ्यानं उभारली २०० कोटींची कंपनी; बॉयफ्रेंडच्या यशाची कहाणी वाचा

इंटर्नशिपमध्ये नक्की काम काय?

वेकफिट कंपनीच्या या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला फक्त ८-९ तास चांगले झोपायचे आहे. तसेच दिवसभरात २० मिनिटांची पॉलर नॅप म्हणजे डुलकी घेणे आवश्यक आहे. यासाठी वेकफिट कंपनीच तुम्हाला झोपण्यासाठी गादी देणार आहे.वीकेंडला कधी कधी तुम्हाला झोपण्याचा कालावधी वाढवावा लागेल.

उमेदवारांची निवड

या नोकरीसाठी जास्त उच्च पात्रतेची गरज नाही. फक्त उमेदवाराला झोपण्याची आवड असायला हवी.झोपायच्या वेळी ऑफिसचे फोन, सोशल प्लान्स आणि टीव्ही या गोष्टींना बाजूला ठेवण्यासाठी तयार असायला हवे. २२ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

Wakefit Sleep Internship
Lakhpati Didi Scheme: महिलांसाठी खुशखबर! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय ५ लाखांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे लखपती दीदी योजना?

या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख रुपये मिळणार आहे. तसेच स्लीप चॅम्पियन ऑफ द ईअर झालेल्या इंटर्नला १० लाखांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे. ज्यांना या इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा आहे ते वेकफीटच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती मिळवू शकतात.

Wakefit Sleep Internship
Success Story: IIT पास, ७ वेळा स्टार्टअप अपयशी, जिद्द सोडली नाही... उभारली कोट्यवधींची कंपनी;Rapido च्या यशामागची कहाणी वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com