Voter Registration : नवमतदारांना या तारखेपर्यंत नाव नोंदवता येणार, राज्यभर स्पेशल कॅम्प

New voters Registration : मतदार यादीत नाव नोंदवणे, नाव वगळणे किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात विशेष शिबिरे राबवण्यात येणार आहे.
Voter Registration
Voter Registrationsaam tv
Published On: 

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव नोंदवणे, नाव वगळणे किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२६ आहे. या पार्श्वभूमीवर, नवमतदारांसह प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना नावाची नोंदणी करता यावी, यासाठी १० व ११ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ घेऊन मतदारांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव सुनिश्चित करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत ७ लाख १९ हजार ३८२ मतदारांनी नमुना-६ मध्ये अर्ज दाखल केले आहेत. मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्तीसाठी ३ लाख ९९ हजार ९२५ अर्ज नमुना-८ मध्ये, तर नावे वगळण्यासाठी १८ हजार ७४८ अर्ज नमुना-७ मध्ये प्राप्त झाले आहेत.

नवमतदारांसाठी नावनोंदणीची सुवर्णसंधी

१ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार, तसेच अन्य पात्र नागरिक ज्यांचे नाव प्रारूप यादीत नाही, ते नमुना-६ भरून आपले नाव नोंदवू शकतात. अर्ज भरताना आवश्यक घोषणापत्र आणि कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.

Voter Registration
SBI Bank : बँक खात्यातून पैसे कट झाले, पण SMS आलाच नाही; SBIला व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश

अर्ज कसा आणि कुठे करावा?

नागरिक आपले अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करू शकतात. तसेच १० आणि ११ ऑक्टोबरच्या विशेष शिबिरांमध्येही थेट अर्ज देता येतील.

ऑनलाइन पद्धत

भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून किंवा Voter Helpline App वरून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येईल.

Voter Registration
PM Kisan Yojana : कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ४,००० रुपये? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

नोटीस प्राप्त मतदारांनी कागदपत्रे सादर करावीत

मागील विशेष सखोल पुनरीक्षणातील नोंदींशी जुळवणी न झाल्यामुळे ('नो मॅपिंग') किंवा जुळवणी होऊनही तार्किक विसंगती (लॉजिकल डिस्क्रिपन्सी) आढळल्यामुळे ज्या मतदारांना नोटिसा मिळाल्या आहेत, ते मतदार १० व ११ ऑक्टोबरच्या विशेष शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतात.

निवडणूक आयोगाने नोटिसमध्ये नमूद केलेल्या १३ प्रकारच्या कागदपत्रांपैकी एखादे कागदपत्र उपलब्ध नसल्यास, इतर कोणतेही वैध दस्तऐवज सादर करता येतील. यासाठी बीएलओ (BLO) ॲपवर हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

१२ ऑक्टोबरची अंतिम मुदत लक्षात घेऊन मतदारांनी वेळेत अर्ज व कागदपत्रे सादर करावीत आणि या विशेष शिबिरांचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com